खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगरशैक्षणिक

राधा गोविंदा ज्ञानोदय विद्यालय कर्की सन 1994/95 दहावी बॅचचे विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या दिमाखात झाला साजरा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

राधा गोविंदा ज्ञानोदय विद्यालय कर्की सन 1994/95 दहावी बॅचचे विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या दिमाखात झाला साजरा :-
आज राधा गोविंदा, ज्ञानोदय विद्यालय कर्की या ठिकाणी सन 1994/ 95 बॅचमधील विद्यार्थी मित्र तब्बल 32 वर्षानंतर एका ठिकाणी स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमानिमित्त एकत्र आले या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष माजी मुख्याध्यापक माननीय पी .एन. कुंभार सर तसेच विद्यमान मुख्याध्यापक एस पी धायले सर, एस एम महाजन सर, आर
सी. पाटील सर एस के तायडे सर, या गुरुजनांनी दीप प्रज्वलन केल्यानंतर राष्ट्रगीत झाले व स्वागत गीताने या कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यानंतर कार्यक्रमाला आलेले प्रमुख पाहुणे सर्व शिक्षकांचे शाल श्रीफळ बुका देऊन स्वागत करण्यात आले तसेच हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले अशा विद्यार्थ्यांचा सुद्धा त्यांच्या विद्यार्थी मित्रांनी सत्कार केला या कार्यक्रमात तब्बल 32 वर्षानंतर सर्वजण एका ठिकाणी जमल्यानंतर सर्वप्रथम प्रत्येक विद्यार्थ्याने आणि विद्यार्थिनींनी आपला परिचय दिला परिचयानंतर शाळेत शिकत असताना ज्या विद्यार्थ्यांमध्ये कला गुण होते त्यांनी काहींनी गाणे म्हटली तर काहींनी चुटकुले ऐकविले तसेच आपल्या सोबतच असणारे काही मित्र आज या जगात नाही जे आपल्याला सोडून गेलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी श्रद्धांजली सुद्धा देण्यात आली शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले श्री एस एम महाजन सर यांनी विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहा आई-वडिलांची सेवा करा असा संदेश आपल्या भाषणातून दिला तर कुठल्याही काम छोटे-मोठे नाही आणि सर्वांशी सौजन्याने वागा असा संदेश एस के तायडे सर यांनी दिला तसेच तुम्ही या शाळेत शिकलेला आहात आणि तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांची मुलं सुद्धा याच शाळेत शिक्षण घेत आहे केव्हाही काही अडचण असेल तर मी आणि आपली शाळा तुम्हाला केव्हाही मदत करण्यास तत्पर राहील अशी ग्वाही विद्यमान मुख्याध्यापक एम पी धायले सर यांनी दिली त्यानंतर आरसी पाटील सर यांनी मुलांच्या जुन्या आठवणींना उजाळा करून दिला शेवटी अध्यक्षीय भाषण ज्येष्ठ श्रेष्ठ असे माजी मुख्याध्यापक पी एन कुंभार सर यांनी सुद्धा मुलांना फार मोलाचे मार्गदर्शन केले राधा गोविंद ज्ञानोदय विद्यालय 1971 ला पहिल्यांदा सुरू करण्यात आली त्यावेळेस पासून चा प्रवास ते त्यांनी दिलेल्या 37 वर्ष सेवेचा आणि या शाळेत डॉक्टर वकील इंजिनियर कशी घडवली आणि शाळा कशी वाढत गेली त्याचा पूर्ण लेखाजोखा विद्यार्थ्यांन समोर मांडणी केली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे विद्यार्थी असलेले प्रमोद सौंदळे तसेच विद्यार्थिनी अनिता पाटील या दोघांनी केले तर या कार्यक्रमासाठी ज्या ज्या लोकांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाला उपस्थित राहिले या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संजय म्हसाने यांनी केले..

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button