महाराष्ट्रसामाजिक

तेल्हाराचे आराध्य दैवत भगवान गौतमेश्वर संस्थान येथे महाशिवरात्रि महोत्सव आनंदात साजरा!महाप्रसादाने श्रीमद् भागवत कथेची सांगता!शिव-शक्ती विवाहाचा सप्तपदी देखावा पाहण्याकरिता पंचक्रोशीतील भाविकांची मंदिरात गर्दी!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे प्रतिनिधी अकोला

तेल्हारा | गौतमा नदी किनारी वसलेले तेल्हारा शहराचे आराध्य दैवत भगवान श्री गौतमेश्वर संस्थान तेल्हारा येथे महाशिवरात्रीनिमित्त गुरुवार दि. 20 फेब्रुवारी 2025 पासून ते गुरुवार दि. 27 फेब्रुवारी 2025 पर्यंत मंदिर परिसरात श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. तेल्हारा येथे वास्तव्यास असलेले रवींद्र महाराज ओलोकार यांनी त्यांच्या ओजस्वी वाणीतून श्रीमद भागवत कथेचे पठण करून भाविकांना मंत्रमुग्ध केले. महाशिवरात्रीनिमित्त निर्माणाधीन असलेल्या भव्य गौतमेश्वर संस्थान मंदिर येथे भगवान शंकर व माता पार्वती यांच्या विवाहाचा आकर्षक मनमोहीत करणारा देखावा साकारण्यात आला असून “शिव-शक्ती” शिव म्हणजे भगवान शंकर व शक्ती म्हणजे अर्थातच माता पार्वती यांचा सप्तपदी घेतानाचा मनमोहीत करणारा सुंदर देखावा याप्रसंगी मंदिरात साकारण्यात आला असून हा देखावा पाहण्यासाठी संपूर्ण पंचक्रोशीतील भाविक-भक्तांची प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. मंदिराचे भव्य निर्माणकार्य सुरू असून महाशिवरात्री निमित्त मंदिराची आकर्षक विद्युत रोषणाईने सुंदर सजावट करण्यात आली होती याप्रसंगी महाशिवरात्रीचे अवचित्त साधून रात्री तेल्हारा शहरातील सुप्रसिद्ध रामदेव बाबा मंडळातर्फे सुंदरकांड व उत्कृष्ट भक्ती गीतांचा संगीतमय कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला होता. दि.27 फेब्रुवारी 2025 रोजी श्रीमद् भागवत कथेची महाप्रसादाने सांगता करण्यात आली. “ओम नमः शिवाय” , “हर हर महादेव” व “श्री शिवाय नमस्तुभ्यम” आदि मंत्रोच्चाराने व जयकाऱ्याने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय होऊन गेला होता.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button