बुलढाणामहाराष्ट्र

कृषिरत्न डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची १२५ वी जन्मशताब्दी निमित्य श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा येथे…

कृषिरत्न डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची १२५ वी जन्मशताब्दी निमित्य श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा येथे…

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा तालुका प्रतिनिधी

तेल्हारा दि.१५ तेल्हारा येथील श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा व श्रीमती पार्वती देवी तापडिया कॉन्व्हेंट यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी रत्न शिक्षण महर्षी डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 125 वी जन्मशताब्दी वर्ष दिनानिमित्त ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी व त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी नवीन उपक्रम सुरू करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यासाठी सहभागी करून कार्यशाळेचे आयोजन श्री सुरेश दादा खोटरे साहेब कार्यकारिणी सदस्य तथा शाळा समिती सदस्य यांच्या संकल्पनेतून करण्यात आले असून आज दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी तान्हा पोळा हा उत्सव आनंदात साजरा केला आहे. यामध्ये शाळू माती पासून शेतकरी यांचा जिवलग साधीदार असलेला बैल ,तसेच बैलजोडी यांच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या तसेच गणेश उत्सवामध्ये प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी शाळू च्या माती पासून गणपतीच्या प्रतिकृती तयार करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी मूर्ती बनविण्यासाठी या कार्यशाळेला लागणारी सर्व शाळूची माती व इतर साहित्या करिता श्री डाॅ विलासराव भांबुरकर आजिवन सदस्य तथा शाळा समिती सदस्य श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा यांच्या मार्फत निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
तसेच विजेता व सहभागी विद्यार्थी यांना प्रोत्साहन बक्षीस वितरण करण्यात येणार आहेत.
कार्यशाळा आयोजन मा श्री प्रमोद काळमेघ मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे .यामध्ये श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा व श्रीमती पार्वती देवी तापडिया काॅन्हेट तेल्हारा येथील विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button