बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

नीट पेपरफुटी, पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि महागाईविरोधात जिल्हा काँग्रेसचा एल्गार

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
चिखली….. प्रतिनिधी

 बुलढाण्यात १ जूनला ‘आसूड मोर्चा’ ;  प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ करणार नेतृत्व

बुलढाणा : राज्यात एकीकडे नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असताना दुसरीकडे पेट्रोल-डिझेल दरवाढ, खतांच्या किमतीत झालेली वाढ आणि सर्वसामान्यांना होरपळून काढणारी महागाई यामुळे जनतेत तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘आसूड मोर्चा’ काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या नेतृत्वात सोमवार १ जून रोजी दुपारी १२ वाजता गर्दे हॉल ते जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा असा भव्य मोर्चा निघणार आहे. या आसूड मोर्चात जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटीचे मावळते अध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे, नवनियुक्त अध्यक्ष प्रकाश पाटील अवचार यांनी केले आहे.

नीट पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले आहे. शेतकऱ्यांना खतांच्या वाढत्या किमतींचा फटका बसत आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे वाहतूक, शेती आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या अपयशी धोरणांविरोधात आता जनतेच्या मनात प्रचंड चीड निर्माण झाली आहे. या आसूड मोर्चातून भाजप सरकारच्या जनविरोधी धोरणांवर काँग्रेस जोरदार प्रहार करणार करणार आहे. या मोर्चामध्ये विद्यार्थी, शेतकरी, युवक, महिला तसेच काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटी

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button