महाराष्ट्रराजकीयविदर्भ

खामगाव नगरपरिषद प्रभाग 10,15,16 मध्ये शिवसेनेचा प्रचाराचा झंजावात नगराध्यक्ष अश्विनी माळवंदे यांना . प्रतिनिधी राजेंद्र मुंडे.

युवा वर्ग लाडक्या बहिणींचा मिळत आहे उदंड प्रतिसाद

खामगाव – आगामी नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेने प्रभाग क्रमांक 10 आणि 15, 16 मध्ये दमदार प्रचाराची सुरुवात केली असून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. अश्विनी रवी माळवंदे यांच्यासह सर्व उमेदवारांना युवा वर्ग व महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तसेच प्रचारामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष पाटील डिवरे उपस्थित राहून युवकांचा उत्साह वाढविला प्रभाग 10 मधून सचिन (श्याम) अंबादास गायकवाड तर प्रभाग 15 मधून शिवसेना पुरस्कृत (अ) उमेदवार श्री. प्रवीण उर्फ पवन शिवाजीराव माळवंदे आणि (ब) उमेदवार सौ. छाया देविदास खराडे

प्रभाग क्रमांक 16 (ब) मधून सौ. पुष्पाताई मोहनराव ठोंबरे मैदानात आहेत.

श्री छत्रपती शिवाजी महाराज वेस येथे महाराजांच्या आणि संत रोहिदास महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन नारळ फोडत प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. तसेच प्रभाग 16 मध्ये श्री हनुमान मंदिरामध्ये शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय अवताडे यांच्या हस्ते नारळ फोडले तर प्रभाग 10 मध्ये श्री खंडोबा देवस्थान येथे शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र बघे यांच्या हस्ते खंडोबारायाचे पूजन करून सचिन (श्याम) गायकवाड यांच्या प्रचारयात्रेला श्रीफळ फोडून सुरुवात झाली. यावेळी शिवसैनिकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. या कार्यक्रमास नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारअश्विनीताई माळवंदे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजुभाऊ अवताडे, शहरप्रमुख चेतन ठोंबरे, युवासेना शहरप्रमुख राहुल कळमकार, तसेच विविध मान्यवरांसह प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, महिलावर्ग आणि युवा मोठ्या संख्येने उपस्थित होते.

घराघरात मिळणारा प्रतिसाद हा प्रभागातील मतदारांचा बदलाचा निर्धार दर्शवत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. महिलांचे मनमोकळे समर्थन, ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि युवकांचा वाढता उत्साह पाहता प्रचारयात्रा जनसागरात परिवर्तित झाली.

सचिन (श्याम) गायकवाड, चेतन ठोंबरे विकी खराडे पवन माळवंदे हे सेवाभाव, विश्वास आणि विकासाचे प्रतीक असून प्रभाग क्र. 10,15,16 चा खरा सेवक म्हणून मतदार त्यांच्याकडे पाहत असल्याचा संदेश या प्रचारातून ठळकपणे उमटला. नागरिकांसाठी सदैव उपलब्ध राहून प्रामाणिक काम करणारे नेतृत्व म्हणून त्यांची प्रतिमा अधिक बळकट झाल्याचे निरीक्षण व्यक्त करण्यात आले.

शिवसेनेच्या नेतृत्वाखाली प्रभाग 10,15,16 मध्ये प्रचाराचा झंझावात पाहता तिन्ही प्रभागांमध्ये शिवसेनेची लढत अधिक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

प्रचार दरम्यान उपस्थित असलेले प्रमुख पदाधिकारी शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख जयश्री ताई देशमुख, सौ. निर्मला ताई हेलोडे, महिला आघाडी उपतालुका प्रमुख ज्योतीताई बुजाडे, शिवसेना शहर संघटक तब्बू तायडे, शिवसेना उपशहर प्रमुख बाळू पाटील खडसे, शिवसेना उपशहर प्रमुख आनंद चिडाले, शिवसेना उपशहर प्रमुख राहुल ठोंबरे, करण छापरवाल, शिवसेना उपशहर प्रमुख भाऊ बिडकर, शिवसेना उपशहर प्रमुख बंटी पवार, विद्यार्थी सेना शहर प्रमख विक्की सारवाण. भमिपत्र वैद्यकीय शिवसेनेच्या नेतृत्वाखाली प्रभाग 10,15,16 मध्ये प्रचाराचा झंझावात पाहता तिन्ही प्रभागांमध्ये शिवसेनेची लढत अधिक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

प्रचार दरम्यान उपस्थित असलेले प्रमुख पदाधिकारी शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख जयश्री ताई देशमुख, सौ. निर्मला ताई हेलोडे, महिला आघाडी उपतालुका प्रमुख ज्योतीताई बुजाडे, शिवसेना शहर संघटक तब्बू तायडे, शिवसेना उपशहर प्रमुख बाळू पाटील खडसे, शिवसेना उपशहर प्रमुख आनंद चिडाले, शिवसेना उपशहर प्रमुख राहुल ठोंबरे, करण छापरवाल, शिवसेना उपशहर प्रमुख भाऊ बिडकर, शिवसेना उपशहर प्रमुख बंटी पवार, विद्यार्थी सेना शहर प्रमुख विक्की सारवाण, भूमिपुत्र वैद्यकीय मदत कक्ष शहरप्रमुख पंकज अंबारे, शिवसेना विभाग प्रमुख अभिषेक तिवारी, गगनजीत सिंग, यांच्यासह प्रमुख पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button