
*शेती व शेतकरी नवरदेवाला नाकारू नका. लग्नाचे वय वाढत आहे_आमदार कुटे*स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव विशेष न्यूज रिपोर्टर श्याम पहुरकर शेगाव येथे 25 डिसेंबर रोजी पांडुरंग कृपा कुणबी समाज भवन मध्ये कुणबी समाज उपवर युवक युवती परिचय संमेलनाचे आयोजन केले होते. या संमेलनाच्या व्यासपीठावर बोलताना आमदार कुटे म्हणाले की नको असलेल्या अपेक्षा व पूर्ण होत नसलेल्या अशा या बाळगत असल्यामुळे बरेच युवक व युवती लग्नापासून मागे राहिलेले आहेत. यामध्ये चूक ही आई वडिलांची मुळीच नाही. आई वडील हे मुला मुलींना चांगले संस्कार देत असतात. प्रत्येक तरुणाला नोकरी लागेलच असे नाही. मग मुलींकरता नोकरीवाला मुलगा मिळेल तरी कुठून? शेती करणारा मुलगा हा सुद्धा उत्तम व्यावसायिकच आहे. शेती करून छोटे-मोठे उद्योग धंदे निर्माण करणारे तरुण सुद्धा नोकरीवाल्यांपेक्षा कुठेच कमी नाहीत. मुलींची जवळची मैत्रीण म्हणजे तिची आई असते. म्हणून आईने मुलींची समजूत काढून जे मुले व्यवसाय करत असतील. शेती करत असतील. बिन व्यसनी असतील. आणि नोकरीवाल्यांपेक्षा चांगले पैसे कमवून स्वतःच्या प्रगतीचे दिशेने वाटचाल करत असतील. मुलांचा समाजात राहण्याचा दृष्टिकोन कसा आहे. वधू-वरांची चौकशी करताना त्यांच्या अंगातील गुण बघा. शेतकरी सुद्धा चांगल्या प्रकारे जीवन जगतो. मुलं मुली दिसायला कसे आहेत यापेक्षा त्यांचा स्वभाव कसा आहे. त्यांची जीवनातील प्रगती करण्याची धडपड कशी आहे. याकडे लक्ष केंद्रित करून मुला मुलींचे लग्न करावे.



