बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

‘नमस्ते दिन’ निमित्त सफाई कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा कवच; आवश्यक साहित्याचे वाटप संपन्न!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी ;शंकर शिवरकर

शहराला चकाचक ठेवणाऱ्या आणि अहोरात्र मेहनत घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत, आज देऊळगाव राजा येथे ‘नमस्ते दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने नगरपरिषद देऊळगाव राजा वतीने सर्व सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्या उपकरणांचे (PPE Kit) आणि साहित्याचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात नगराध्यक्ष सौ.माधुरीताई शिपने यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करून करण्यात आली. यावेळी बोलताना प्रमुख पाहुण्यांनी सांगितले की, “सफाई कर्मचारी हेच आपल्या शहराचे खरे शिल्पकार आहेत. त्यांची सुरक्षा आणि आरोग्य ही आपली सामूहिक जबाबदारी असून, त्यांना आधुनिक सुविधा पुरवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.”
या विशेष मोहिमेअंतर्गत कर्मचाऱ्यांना हेल्मेट, हातमोजे (ग्लोव्ह्ज), गमबूट, एन-९५ मास्क आणि सेफ्टी जॅकेट यांसारख्या अत्यावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. या साहित्यामुळे गटारे आणि ड्रेनेज स्वच्छ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जीवघेण्या धोक्यांपासून सुरक्षितता मिळणार आहे. तसेच, साहित्याच्या योग्य वापराबाबत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन देखील करण्यात आले.
या उपक्रमामुळे सफाई कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसत होते.
नगर परिषद देऊळगाव राजा नागरिकांना स्वच्छता राखणे, ओला व सुका कचरा वेगळा करणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे आणि स्वच्छ सर्वेक्षण २०२६ मध्ये सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन करत आहे.
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित नगराध्यक्ष सौ माधुरीताई तुषार शिंपणे, उपाध्यक्ष सौ वनिता राजेश भुतडा मॅडम, गटनेते प्रदीप भाऊ वाघ साहेब, आरोग्य सभापती श्री संदीप शिंदे साहेब मुख्याधिकारी श्री अरुण मोकळ साहेब राजूभाऊ खांडेभरा उषा ताई गिते, राजेचे भुतडा,शिवाजीभाऊ महेत्रे विकास भाऊ कासारे, सर्व अधिकारी व कर्मचारी स्वच्छता कर्मचारी आदी उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे संचालन प्रकल्प अधिकारी श्री राजेश वानखेडे यांनी केले व प्रास्ताविक शहर समन्वयक सचिन शिंगणे यांनी केले यावेळी स्वच्छता कर्मचारी यांना स्वच्छतेविषयी काम करत असताना घ्यावयाची काळजी घेणं आवश्यक असते त्यांना राष्ट्रीय स्तरावर आयोजित वेबिनार दाखवून प्रेरित करण्यात आले

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button