श्री संत गजानन महाराज संस्थानच्या पायदळ दिंडीचे शुक्रवारी पंढरपूरकडे प्रस्थान

(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)
| टाळकरी, वारकरी, पताकाधाऱ्यांसह सुमारे ७०० जणांचा सहभाग
खामगांव-शेगांव । प्रतिनिधी
संतनगरी शेगांव येथील श्री गजानन संत संस्थानची पालखी पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी २६ मे रोजी शेगाव येथून प्रस्थान होणार आहे. यामध्ये टाळकरी वारकरी पताकाधारी यांच्यासह ७०० जणांचा सहभाग राहणार असल्याची माहिती समजली आहे. या पादयळ दिंडीमधील पालखीमध्ये श्रींच्या पादुका राहणार आहेत. या पालखीची
महाराज
श्री संत गजानन महाराज संस्थान तर्फे तयारी करण्यात येत आहे. . ही पालखी मार्गक्रमण करीत २७ जून रोजी पंढरपूरला पोहोचणार आहे. त्याठिकाणी २७ जून ते २ जुलै पर्यंत असा सहा दिवस पालखीचा तेथे मुक्काम राहणार आहे. २ शेगाव ते पंढरपूर पालखीचा मार्ग असा श्री क्षेत्र नागझरी गायगाव, अकोला भरतपूर ड – देऊळगाव साकर्शा, मेडशी , मालेगाव, चिंचावा पेन ,
किनखेडा, पानकन्हेरगाव
श्री क्षेत्र नरशी ( नानदेव ), परभणी, ब्राम्हणगांव तळी , परळी, कन्हेवाडी, लोखंडी सावरगाव, मोटेगाव, किनी दडगाव सिध्देश्वरव, सांगवी सोलापूर कामती बु ब्रम्हपूरी श्री क्षेत्र मंगळवेढा मार्गे पंढरपूरला जाईल पालखीचा परतीचा मार्ग असा आषाढी एकादशीच्या यात्रेनंतर ही पालखी शेगावकडे परतीच्या प्रवासाला ३ जुलैपासून पंढरपूर ङग येथून निघणार आहे. कुर्मदास,
रिधोरे, भगवान बार्शी , माणकेश्वर, कुंथलगिरी, उदंड वडगांव, बीड, पेडगांव , महागड, पारनेर, धनगर पिंत्री जालना न्हावा किनगावराजा, किनगांव , सुलतानपूर, नायगांव दतादूपूर, वरवंड, विहीगांव मार्गे २३ जुलै रोजी खामगांवला येणार आहे. या ठिकाणी पालखीचा मुक्काम राहणार आहे . दुसऱ्या दिवशी म्हणजे २४ जुलै रोजी ही पालखी शेगावकडे प्रस्थान करणार आह.



