Uncategorizedखानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

मुक्ताईनगर मध्ये हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन श्री राम भक्त हनुमान आणि वानर सेनेचा जिवंत देखावा मुख्य आकर्षणाची सर्वत्र चर्चा

(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी प्रमोद सौंदळे):-

सविस्तर वृत्त असे की सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा हनुमान जयंती निमित्त मुक्ताईनगर मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी भंडाऱ्याचे कार्यक्रम करण्यात आलेले आहे मुक्ताईनगर मधील हनुमान मंदिरांमध्ये विधिवत पूजा अर्चना करून हनुमान जयंती उत्सव समिती तर्फे श्री राम भक्त हनुमान तसेच सेवक वानर सेनेचा सजीव देखावा साकारण्यात आलेला होता या सचिव देखाव्याचे मुक्ताईनगर मधून रॅलीला सुरुवात करून ही रॅली पुढे प्रवर्तन चौक मार्गे पंचक्रोशीतील तथा लाखो हिंदूंचे श्रद्धास्थान असलेले जागृत हनुमान मंदिर शिरसाळा तालुका बोदवड या ठिकाणी पायी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये मुख्य आकर्षण असलेला सजीव देखावा बघण्यासाठी मुक्ताईनगर तालुका वाशी प्रवर्तन चौकामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते या सजीव देखाव्याची संपूर्ण तालुक्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने श्रीराम भक्त हनुमान भक्त युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला बजरंग बली की जय जय श्रीराम या घोषणांनी युवकांनी मुक्ताईनगर शहर दणाणून सोडले ही रॅली पुढे शिरसाळा मारुती या ठिकाणी मार्गस्थ झाली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button