खानदेशजळगावा जिल्हाजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

“खडसे महाविद्यालयात पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी साहित्य समीक्षा व प्रबंध लेखन कार्यशाळा संपन्न”

मुक्ताईनगर : श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागात दि. 13 सप्टेंबर रोजी पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी ‘Literature Review and Dissertation Writing’ या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपप्राचार्य डॉ. संजीव साळवे यांनी भूषविले. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. सचिन येवले, विभागप्रमुख, रसायनशास्त्र विभाग, नाहाटा कॉलेज, भुसावळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यशाळा दोन सत्रांमध्ये पार पडली. पहिल्या सत्रात डॉ. येवले यांनी Literature Review या विषयावर मार्गदर्शन केले. संशोधनासाठी साहित्य संकलनाचे स्रोत, योग्य माहितीची निवड, संदर्भलेखन पद्धती व साहित्य समीक्षेत नाविन्यपूर्ण दृष्टिकोन कसा आणावा यावर त्यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.दुसऱ्या सत्रात त्यांनी Dissertation Writing या विषयावर भाष्य केले. प्रबंधाची रचना, अध्यायांची मांडणी, डेटा व निष्कर्ष सादरीकरण, लेखनशैली आणि शोधनिबंधातील सुसंगतता यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले. अध्यक्षीय भाषणात डॉ. साळवे यांनी विद्यार्थ्यांनी संशोधनात प्रामाणिकपणा, सखोलता आणि चिकित्सक दृष्टिकोन यावर भर द्यावा, असे प्रतिपादन केले. तसेच अशा कार्यशाळांमुळे विद्यार्थ्यांच्या संशोधन क्षमतेला चालना मिळते, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना डॉ. बालाजी तोटावर यांनी केली. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. सी. जे. पाटील, प्रा. अमोल ढाके, प्रा. लतेश भंगाळे व डॉ. एस. पी. भले यांनी परिश्रम घेतले.शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यशाळेची सांगता झाली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button