निधननिवडणूक

रिसोड मध्ये निवडणूक होणार घमासानविजया साठी पंचवीस मध्ये सामना .

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव : – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा हा शेवटचा दिवस आहे. अशा स्थितीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ३३ रिसोड विधानसभा मतदारसंघात सहा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. आता मतदारसंघात चौरंगी लढत होणार आहे.
रिसोड विधानसभा निवडणुकीतून सहा जणांची माघार घेतल्याने 13 जण निवडणूक रिंगणात आहेत. त्यामध्ये महाविकास आघाडीचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे मावळते आमदार अमीत झनक तर महायुतीत शिवसेना शिंदे गटाच्या आमदार भावना गवळी ( विधान परिषद सदस्य ) आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत गोळे यांच्या मध्ये निवडणूक रंगणार असे दिसत असतांनाच जिल्ह्यातील बडे प्रस्थ अनंतराव देशमुख यांनी आपला उमेदवारी कायम ठेवल्याने रिसोड – मालेगाव मतदारसंघात आता निवडणूकीत चुरस निर्माण झाली आहे. त्यांनी यापूर्वीही अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती आणि त्यामुळेच त्यांना कॉग्रसने पक्षातून निलंबित केले होते.
सध्या ते भाजप मध्ये आहेत. अजून त्यांनी पक्ष सोडला नाही किंवा भाजपने त्यांना पक्षातून बाहेर काढले नाही. भाजप मधील एक गट त्यांच्या सोबत दिसतो तर एक गट महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी वणवण आमदार गवळी सोबत फिरत आहे. आज रिसोड मध्ये निवडणूक कार्यालयात उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी लगबग सुरू होती तेव्हा आमदार भावना गवळी व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मालेगाव शहरात फिरून निवांत निवडणूक प्रचार केला.
आज शेवटचा दिवशी नामनिर्देशन पत्र मागे घेतलेले उमेद‌वार पुढीलप्रमाणे.रमेश गोरसिंग पवार राष्ट्रीय बहुजन पार्टी, उध्दव सदाशिव तहकिक अपक्ष,दत्तराव भिकाजी धांडे अपक्ष,पंडित धनंजय दिनकर अपक्ष, प्रमोद अनिल गंगावणे अपक्ष,शहबाज खान ऐजाज खान अपक्ष,
आता मंगळवार पासून निवडणूकीचा जाहीर प्रचार सुरू होईल. अखेर च्या टप्प्यात खरी मजा येईल. बहुतेक उमेदवार हे रिसोड तालुक्यातील रहीवाशी आहेत त्या मुळे मालेगाव तालुक्यातून मिळणारा लिड निर्णायक असेल असा जाणकारांचा कयास आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button