मैदानी चाचणी दिली….. चार तासात काळाने इसकावला जीव , रेल्वे पोलीस भरतीसाठी मुंबईला गेलेल्या युवकाचा दुर्दैवी मृत्यू ,

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी : प्रशांत चव्हाण
बावनबीर : राज्य रेल्वे पोलीस दलाच्या भरतीसाठी मोठ्या आशेने मुंबई गाठलेल्या युवकाचा मैदानी चाचणी पूर्ण केल्यानंतर अवघ्या चार तासात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अर्जुन उर्फ अक्षय तुळशीराम मसाळ ( वय ३० ) रा. बावनबीर असे मृत युवकाचे नाव असून. याप्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे,
२३ फेब्रुवारी सकाळी ही घटना घाटकोपर येथील लोहमार्ग पोलीस मुख्यालयाच्या ग्राउंड वर ही मैदानी परीक्षा देऊन अक्षय मित्रासह बाहेर पडला . शारीरिक चाचणीत त्याने १०० मिटर ते १६०० मिटर धाव पूर्ण केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सकाळी ११:३० वाजता तो केंद्र बाहेर पडला.
काही अंतर चालल्यानंतर थकवा जाणवल्याने त्याने जवळ असलेल्या साई मंदिरात विसावा घेण्याचे ठरवले. मात्र तेथे विश्रांती घेत असताना अचानक त्याला भोवळ येऊन फीट आली . आणि तो बेशुद्ध पडला, सोबत असलेल्या मित्रांनी त्याला ताबडतोब जवळ असलेल्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले , परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.



