बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा ! वान धरणाचे २ दरवाजे उघडले; नदीपात्रात ३१८२ क्यु सेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू!

आवाज द्यायचा , स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
विजय मनोहरराव घोडे

दि.१९ सप्टेंबर २०२६

वारी भैरवगड /अकोला: वान धरण क्षेत्रात होत असलेल्या संततधार पावसामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आज, १९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९:०० वाजता वान प्रकल्पातून नदीपात्रात केला जाणारा पाण्याचा विसर्ग लक्षणीयरीत्या वाढवण्यात आला आहे. नयन लोणारे वान प्रकल्प ,पूर नियंत्रण कक्ष यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार आधीचा ३६.४३ घनमीटर प्रति सेकंद असलेला विसर्ग आता वाढवून ९०.०९ घनमीटर प्रति सेकंद (३१८२ क्यु सेक) एवढा करण्यात आला आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सध्या २ वक्रद्वारे (गेट्स) प्रत्येकी ५० सेंटीमीटर उंचीने उघडण्यात आली असून, त्यामधून नदीपात्रात पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू आहे.

प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा: धरण क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याची आवक पाहून पुढील काळात विसर्ग कमी किंवा अधिक करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे वान प्रकल्प पूर नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नदीपात्रातील पाण्याची पातळी वेगाने वाढण्याची शक्यता असल्याने, अकोला व बुलढाणा सीमेवरून वाहत असणाऱ्या वाण नदीकाठच्या सर्व गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे आणि नदीपात्रात उतरणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button