जळगावा जिल्हामहाराष्ट्रसंपादकीय

भाजप या जेल?सियासी खेल!

भाजप केंद्रात सत्तेवर येण्याआधी कांग्रेस व तत्सम पक्षातील आमदार खासदार मंत्र्यांनी खुलेआम भ्रष्टाचार केला.कोणतीही लाज लज्जा शरम ठेवली नाही.कोर्टात जाऊन ही भ्रष्टाचारी मोकळे सुटत असत.चोरीचे पैसे निवडणुकीत वापरून पुन्हा पुन्हा तेच ते निवडून येत असत.जनता हतबल झाली.हताश झाली.कुठे वाट मिळेना.काही दिशा मिळेना.म्हणून आण्णा हजारे यांनी लोकपाल ची मागणी लावून धरली.पार्लमेंट आणि असेम्ब्ली मधील चोर तर ऐकायला तयार नव्हते.म्हणे हा कोण माणूस, सत्तेबाहेर राहून आम्हाला चोर समजतो? म्हणून अण्णांनी आठ राज्यात तीन महिने दौरा केला.या राजकीय चोरांवर वचक ठेवण्यासाठी लोकपाल ची गरज आहे,असे आम जनतेपर्यंत विचार पोहचवले. याचप्रमाणे  अरविंद केजरीवाल  इंडिया अगेन्स्ट करप्शन ची चळवळ चालवत होते.त्यांनी आण्णा हजारेंना गुरू केले.दोघांनी नियोजन केले कि,आता थेट दिल्लीत जंतरमंतर वर आंदोलन करायचे.सर्व काही रीतसर चालत असतांना कांग्रेस च्या चोर आणि नालायक मंत्री ने आण्णांना अटक केली.म्हणे हा सेकंड गांधी आम्हाला चोरी करू देत नाही.चोरी करणे तर आमचा घटनात्मक अधिकार आहे.म्हणून त्यांनी आण्णांना जंतरमंतरवर अटक केली.आण्णा सेकंड असले तरी खरोखरच गांधी बनले.अडून बसले.म्हणे,मी येथेच जेलमध्ये आंदोलन करतो.
 चोर तो चोर वरून शिरजोर म्हणून भारतीय जनता चवताळली.म्हणे हे राजकीय चोर एका समाजसेवकाला अटक करतात.ही हिंमत? भारतीय जनता आण्णांच्या मागे उभी राहिली.मैं भी आण्णा,अशी टोपी घालून रस्त्यावर उतरली.तेंव्हा कांग्रेस मधील चोरांची हिंमत फाटली.हे तर भयंकर झाले.आत्ताच इराकच्या लोकांनी सद्दाम ला विजेच्या खांबावर लटकावून फासावर दिले आहे.तसे आम्हाला केले तर! हेच ते सोनिया गांधी, मनमोहनसिंग,पी चिदंबरम,शरद पवार, कपील सिब्बल.जनतेच्या क्षोभापुढे हे हारले,नमले.यांनीच अण्णांच्या आंदोलनासाठी रामलिला मैदानावर मंडप बांधून दिला.स्टेज बांधून दिले.म्हणे,आण्णा ,आता बसा उपोषणाला.आण्णा बसले उपोषणाला.ही कमाल आहे जनतेच्या आंदोलनाची.कौन कहता है,आकाशमे छेद नही होता,एक पत्थर तबीयतसे उछालो यारो! आण्णांनी थेट सरकारवर दगड भिरकावला.सरकारला छिद्र नव्हे ,भगदाड पाडले.कधीही शिवता न येण्यासारखे.
  आण्णांचे आंदोलन आता फक्त भारतापुरते मर्यादित राहिले नाही.ते जगभरात पसरले.भारत मे फिरसे दुसरा गांधी पैदा हुआ है.भारतात नव्हे,इतर देशातही जनतेने अण्णांच्या समर्थनार्थ आंदोलन केले.इतर देशांचे भारत सरकारवर दडपण येऊ लागले.काहीही करून हे मिटवा,थांबवा.हे लोण जर इंग्लंड अमेरिका रशिया जपान मधे पसरले तर पळायला जागा उरणार नाही.म्हणून केंद्र सरकारने तातडीची पार्लमेंट बोलवली.लोकपाल विधेयक पारीत करून घेतले.आण्णांना दाखवले.उपोषण सुटले.
 लोकपाल जरी नियुक्ती केली नाही पण याचा परिणाम झाला.कांग्रेस उलटीपालटी झाली.२०१४च्या सार्वत्रिक निवडणुकीत कांग्रेस भुईसपाट झाली.राजकिय चोरीमुळे चोरांना मोठा झटका जनतेने दिला.केंद्रात भाजप आणि दिल्ली राज्यात आप सत्तेवर आली.आजही मोडकळीस आलेली कांग्रेस सुटी हाडके घेऊन निपचित पडली आहे.
 या संधीचा फायदा भाजपने चांगला उचलला.केंद्रात आणि इतर राज्यात भाजप सत्तेवर आली.यात नरेंद्र मोदींची घोषणा जास्त भावली.अगर भाजप सत्तापर आयी तो आधी कांग्रेस और राष्ट्रवादी जेलमे रहेगी.लोकांना हेच तर पाहिजे होते.तोच उपक्रम आता महाराष्ट्रात राबवला जात आहे.शिवसेना आणि राष्ट्रवादी वर.
  राष्ट्रवादी ही सरदार, सरंजामदार,राव,उमराव लोकांची पुंजीवादी पार्टी.राजकारणातून सत्ता, सत्तेतून पैसा.पुन्हा निवडणूक, पुन्हा सत्ता, पुन्हा पैसा.पार्टीचा मुख्य उद्देश तोच,पैसा कमवणे.असे करतांना शरद पवार यांनी कोणालाही चोरीपासून अडवले नाही,थांबवले नाही.अडवले ते नरेंद्र मोदींनी.एकेक चोराला इडीची बेडी घालून जेलमध्ये टाकले.हेच तर पाहिजे होते जनतेला.तेच तर आज चालू आहे, महाराष्ट्रात.भुजबळ, देशमुख,मलिक अशी मालिका सुरू केली.हे तर जात्यात घेतले. हसन मुश्रीफ, अजितदादा,पटेल सुपात घेतले.यांना केंव्हाही जात्यात टाकू शकतात.याच भीतीने अजितदादा पॅनिक झाले आहेत.कदाचित यांना दिल्लीहून फोन येत असतील.काय दादा,काय निर्णय घेतला?जेलमधे जाता कि भाजपात येता?दादांनी इतकी माया जमवली कि, हिशोब द्यायला एक पिढी खर्ची पडेल.ही घुसमट शरद पवारांना सांगूनही कळत नसेल तर काय करणार? म्हणून दादा कधी रिचेबल तर कधी नॉट रिचेबल होतात.किती वेळा काय उत्तरे द्यायची? त्यापेक्षा एकदाचे भाजपात गेलेले काय वाईट? राष्ट्रवादी चे काय घेऊन बसले आहेत?
  ही अवस्था फक्त शरद पवारांचीच नाही,उद्धव ठाकरेंची आधी झाली आहे.साथीदारांनी अतिरिक्त चोरी केल्यामुळे जिवाचे जिवलग असले तरी जेलमध्ये जाण्याच्या भीतीने ठाकरेंना सोडून भाजपला जाऊन मिळाले.आता उर बडवून काहीच उपयोग नाही.आपल्या साथीदारांनी, अनुयायांनी चोरी करू नये,असा प्रयत्न ठाकरे किंवा पवारांनी कधीच केला नाही.उलट कोणी अन्य पक्षाने हाकललेले चोर आपल्या गॅंगमधे सामील करून घेतले.हेच कृत्य ठाकरे व पवारांना भोवले.चोरांची संघटना काढली.धंदा जोरात चालला.पण कधीतरी चोर पकडले जाणारच.इतके साधे भान ठाकरे व पवारांना राहिलेले नाही.
  भाजप जरी एकतर्फी विरोधकांवरच इडीची कारवाई करीत असले  किंवा भाजपात येण्यासाठी डोळे वटारत असले तरीही चूक तर ठाकरे आणि पवार यांच्या कंपनीची आहे.आपल्या पक्षातील मंत्री किंवा  कंपनीतील सदस्य किंवा गिरोहमधील दस्यू जर लुटमार करीत असेल तर त्याला वेळीच थांबवले पाहिजे.थोडीतरी मनाची नाही तरी जनाची तरी लाज बाळगली पाहिजे.पण असे होतांना दिसत नाही.अजूनही तशी सुबुद्धी ठाकरे आणि पवार यांना कोणी देतच नाहीत.आपल्या पक्षाची ही अवस्था चोरी केल्यामुळेच झाली आहे,हे मान्य करीतच नाहीत.म्हणून ही बरबादीची वेळ आली आहे.
ठाकरे साहेब, पवार साहेब अजूनही वेळ गेलेली नाही.जर राजकीय पक्ष टिकवून ठेवायचे असतील तर चोरांना पक्षातून हाकलून सज्जनांना सोबत घ्या.स्वत: स्वताच्या चोरांची इडीकडे तक्रार करून जेलमधे टाका.जेणेकरून त्याचा फायदा भाजपला होणार नाही.केसरीया आणि जोहार ही संकल्पना अशाच प्रसंगातून सुचलेली होती.आता तोच उपाय आम्ही तुम्हाला सुचवत आहोत.हाच एक पर्याय तुमच्यासमोर उपलब्ध आहे. 

“बरबादीके पहले संभलना हो तो,
अपनी कमजोरी को जान लो.
अगर बचीकुची बचानी हो तो,
केसरीया,जोहार को अपना लो.”

… शिवराम पाटील
महाराष्ट्र जागृत जनमंच.
जळगाव.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button