महाराष्ट्रविदर्भ

वंचित बहुजन युवक आघाडीच्या मुंबई अध्यक्षावर आंबेडकर भवन परिसरात प्राणघातक हल्ला

(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)

आज दिनांक २७ मे रोजी आंबेडकर भवन दादर येथे वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेश च्या कार्यकर्त्यांची बैठक होती. मुंबईत सध्या वंचित बहुजन आघाडी च्या जोरदार सभा होत आहेत. पुढील सभा ही ३ जून रोजी होणार आहे त्याची तयारी करण्यासाठी कार्यकर्ते जमले होते. सायंकाळी ठिक ६.३० ते ७ च्या दरम्यान वंचित चे मुंबई युवा प्रदेश अध्यक्ष श्री. परमेश्वर रणशुर आणि वॉर्ड अध्यक्ष गौतम हराळ यांच्यावर आंबेडकर भवन परिसरात चार अज्ञातखोर इसमांनी लोखंडी रॉड, आणि तलवार, चोपर घेवून जीवघेणा हल्ला केला. हा हल्ला परमेश्वर रणशूर वर नसून हा आंबेडकर भवन वरील हल्ला आहे. मागे मान.बाळासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपशब्द बोलून आंबेडकर घराण्या संबंधी अपशब्द बोलणाऱ्या जगदीश गायकवाड कडे संशयाची सुई आहे. या हल्ल्याचा आम्ही वंचित बहुजन आघाडी तर्फे आणि तमाम आंबेडकरी जनते तर्फे निषेध व्यक्त करतो.
आंबेडकर भवन वरील हल्ला खपवून घेणार नाही. जनतेत संतप्त प्रतिक्रिया आहे.

रेखाताई ठाकूर
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष
वंचित बहुजन आघाडी

जाहिर #निषेध

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button