जळगावा जिल्हाबुलढाणा

हिवरखेड येथे पोट, लिव्हर व स्त्री रोग निदान शिबिराचे आयोजन

राजस्थानी नवयुवक मंडळ हिवरखेड व जगद्गुरू प्रबोधन मंडळ तेल्हाराच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. 25 जानेवारी रोजी माहेश्वरी भवन हिवरखेड येथे सकाळी 11 ते दुपारी 3.00 पर्यंत पोट, लिव्हर व स्त्रीरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात अकोला येथील प्रख्यात लिव्हर व पोट विकार तज्ञ् डॉ. आशिष तापडिया व प्रसुतीशास्त्र, स्त्री रोग व वंध्यत्व निवारण तज्ञ् डॉ. नेहा राठी (तापडिया ) हे रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन करणार आहेत.या शिबिरात दुर्बीणद्वारे तपासणी व उपचार केल्या जाणार असून विशेषतः स्त्रियांच्या समस्यावर अचूक तपासणी करून योग्य मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाचे आरोग्याकडे थोडेफार का होईना दुर्लक्ष होतेच व बहुतांश लोकांना ऍसिडिटी, पोट फुगणे, शौचास साफ न होणे इत्यादी समस्या आहेत या सगळ्या आजारांचा शोध घेऊन लोकांना पुन्हा आनंदी जीवन जगता यावे यासाठी त्याचप्रमाणे बऱ्याचशा स्त्रिया पुरुष डॉक्टर कडे किंवा ओळखीच्या महिला डॉक्टर कडे सुद्धा आपल्या समस्या सांगताना संकोचतात अशा महिलांसाठी हे शिबीर अतिशय उपयुक्त ठरणार आहे. तरी या शिबिराचा जास्तीतजास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन राजस्थानी नवयुवक मंडळ हिवरखेड व जगद्गुरू प्रबोधन मंडळ तेल्हारा यांनी केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button