राजकीय

ठाकरे गटाला आणखी मोठा धक्का! थेट दिल्ली संसदेतील पक्षाचं कार्यालय जाणार? मोठी अपडेट समोर

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

ठाकरे गटाला आता आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संसदेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यालय जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सध्या ठाकरे गटाकडे केवळ 3 खासदार उरले असून, त्यांच्या 6 खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे संसदेतील पक्षीय ताकद मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.दिल्लीतील संसदेत पक्ष कार्यालय वाटपासाठी खासदारांची संख्या महत्त्वाची मानली जाते. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे कार्यालय कायम राहणार की ते काढून घेतले जाणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, लवकरच याबाबत संसदीय पातळीवर निर्णय होण्याची शक्यता आहे.दरम्यान, उद्धव ठाकरे गटाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, शिंदे गटाने खासदारांच्या प्रवेशानंतर आपली ताकद वाढल्याचा दावा केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणासह दिल्लीतील घडामोडींनाही आता वेग आला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button