महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची बुलडाणा जिल्ह्याचा दुष्काळसदृश जिल्ह्यांच्या यादीत समावेश करा म्हणून केंद्रीय मंत्री नामदार मा.श्री.प्रतापरावजी जाधव साहेब यांनी मुंबईतील “वर्षा” या शासकीय निवासस्थानी भेट घेतली.

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्यामुळे खरीप पिकांवर गंभीर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर शासनामार्फत १८ दुष्काळसदृश जिल्ह्यांचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याची कार्यवाही सुरू आहे. सदर यादीमध्ये बुलढाणा जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला नाही.
बुलडाणा जिल्ह्यात पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्याने सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद यांसह खरीप पिकांवर मोठे संकट निर्माण झाले आहे. भारतीय हवामान विभागाच्या साप्ताहिक पर्जन्यमान अहवालानुसार २ सप्टेंबर २०२६ रोजी संपलेल्या आठवड्यात जिल्ह्यातील पर्जन्यमान सामान्यापेक्षा तब्बल ८७% कमी नोंदविण्यात आले आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत बुलडाणा जिल्ह्याचा १८ दुष्काळसदृश जिल्ह्यांच्या यादीत तातडीने समावेश करावा,म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब
यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आग्रही मागणी केली आहे.तसेच खरीप पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसान सर्वेक्षण व पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नियमानुसार तातडीची आर्थिक मदत व पीकनुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली.
बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी सध्या अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहेत. शासनाच्या मदतीपासून जिल्ह्यातील एकही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी बुलडाणा जिल्ह्याचा दुष्काळसदृश जिल्ह्यांच्या यादीत तातडीने समावेश करून आवश्यक आर्थिक व प्रशासकीय मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना द्यावेत,हि विनंती केली.
मुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
माझ्या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मी सदैव सतत प्रयत्नशील राहीन…..
📍 वर्षा निवासस्थान,मुंबई

माझ्या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मी सदैव सतत प्रयत्नशी राहिल….