महाराष्ट्र

आशा वर्कर,अंगणवाडी सेविका,मदतनीस यांचा ॲड.नकुलदादा देशमुख यांच्याकडून गौरवरक्षाबंधन निर्मित कर्तुत्वाचा सन्मान

आशा वर्कर,अंगणवाडी सेविका,मदतनीस यांचा ॲड.नकुलदादा देशमुख यांच्याकडून गौरव
रक्षाबंधन निर्मित कर्तुत्वाचा सन्मान

रिसोड व मालेगाव मधील सेविकांना रक्षाबंधननिमित्त भेटवस्तू

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगांव – : मालेगांव व रिसोड तालुक्यातील आशा वर्कर अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचा रक्षाबंधन निमित्त भावाकडून बहिणीला सदिच्छा भेट कृतज्ञता सोहळा देशमुख यांच्या संकल्पनेतून संपन्न झाला.
आशा वर्कर अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे कोरोना काळ व त्यानंतर प्रत्येक क्षणी प्रत्येक गावात कार्य मोलाचे आहे.त्यांच्या कार्याचा,योगदानाचे गौरव व्हावा यासाठी ॲड.नकुलदादा देशमुख यांनी रक्षा बंधनाच्या औचीत्यावर आशा वर्कर,अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता.रिसोड व मालेगाव तालुक्यातील सर्व आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सत्कार व त्यांना भेट वस्तू देऊन या कृतज्ञता सोहळ्यात त्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी मोठ्या संख्येने रिसोड व मालेगाव तालुक्यातील या समाजात अनमोल कार्य करणाऱ्या महिला उपस्थित होत्या.यावेळी रिसोड येथील सातारकर महाराज संस्थान येथे पार पडलेल्या सन्मान सोहळ्यास ॲड.नकुल दादा देशमुख,सौ.जयश्रीताई देशमुख,नगराध्यक्ष विजयमाला कृष्णाजी आसनकर,ठाणेदार देवेंद्र ठाकूर,रिसोड मुख्याधिकारी शेवदा, कऱ्हाड मॅडम, डॉ.सौ.सुनंदा देशमुख, सौ. माधुरीताई देशमुख,वैशाली संदीप इरतकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होते.तसेच सर्व जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य,नगर परिषद सदस्य,खरेदी विक्री सदस्य,कृषी बाजार समिती सदस्य तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी विचार व्यक्त करतांना ॲड.नकुलदादा देशमुख म्हणाले की,गाव,खेडोपाडी एक प्रकारे समाज सेवेच अनमोल कार्य करणाऱ्या आशा वर्कर, अंगणवाडी सेविका,अंगणवाडी मदतनीस यांचा उचित सन्मान व गौरव होणे गरजेचे आहे.त्यामुळे समानता दिवस व रक्षाबंधनाच्या पावन पर्वावर हे कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करणे कर्तव्य होते.त्यामुळे हा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला आहे.यावेळी मालेगाव तालुक्यात हरनारायण(काटेकर)मंगल कार्यालय येथे पार पडलेल्या सन्मान सोहळ्यास सौ.जयश्रीताई देशमुख,भाजप जिल्हाध्यक्ष शाम बढे,गजाननराव देवळे,विवेक माने,शोभाताई गौंढाळ,प्रकाश पाटील कुटे,गजाननराव लाटे, ॲड.मगर,नीलकंठ कुटे,बाबुआप्पा गौंढाळ,संतोष तिखे,आयुब सर,संदीप पिंपळकर पप्पु कुटे यांची उपस्थिती होती.
यावेळी सविता इंगळे,ॲड मगर,सुषमा खरात,विवेक माने,शाम बढे यांनी विचार व्यक्त केले.यावेळी मालेगाव येथे विचार व्यक्त करतांना ॲड नकुल दादा देशमुख म्हणाले की, आज समानता दिवस आणि रक्षाबंधन यांचे औचित्य याच दिनी माझ्या भगिनी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचा सन्मान हा दुग्ध शर्करा योग आहे.आणि तो सन्मान आमच्या कडून होतोय हा आमचे भाग्यच कारण या सर्वांचे कार्य हे खरच मोठ आहे.यावेळी रिसोड व मालेगाव तालुक्यातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना ॲड नकुलदादा देशमुख यांच्या कडून साडी,सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.दोन्ही तालुक्यातून मोठ्या संख्येने या कार्यक्रमास आशा वर्कर अंगणवाडी सेविका मदतनीस उपस्थित होत्या. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका मदतनीस यांचा अशा प्रकारे कुणीही सन्मान केला नाही तो सन्मान ॲड नकुल दादा देशमुख यांनी केला याबद्दल सर्व आशा वर्कर अंगणवाडी सेविका,मदतनीस यांनी नकुल दादा यांचे कौतुक करून आभार व्यक्त केले.यावेळी रिसोड व मालेगाव तालुक्यातील सर्व आशा वर्कर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी ॲड.ॲड.नकुलदादा देशमुख यांना राखी बांधून भावा बहिणींच नात घट्ट केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button