तेल्हारा शहरात सेठ बन्सीधरजी झुनझुनवाला यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा थाटात संपन्न ! विजय घोडे अकोला जिल्हा प्रतिनिधी स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

तेल्हारा – स्थानिक सेठ बन्सीधर विद्यालयाच्या शताब्दी महोत्सवा निमित्त, संस्थेचे संस्थापक स्वर्गीय सेठ बन्सीधरजी झुनझुनवाला यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा गेल्या आठवड्यात मंगळवार दि. 29 जुलै रोजी सेठ बन्सीधर दहिगावकर एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात मोठ्या थाटात संपन्न झाला . हा दिवस ग्रामीण भागात शिक्षणाचा वटवृक्ष रोवणाऱ्या सेट बन्सीधर दहिगावकर एज्युकेशन सोसायटी करिता अतिशय गौरवाचा दिवस ठरला.
यावेळी अनावरण सोहळ्याकरिता आलेल्या पाहुण्यांचे स्वागत उत्कृष्ट लेझीम व घोष पथकाच्या वादनाने करण्यात आले.
यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन सुरेशजी झुनझुनवाला (वर्धा) यांच्या हस्ते पार पडले. संस्थापकांच्या प्रतिमेचा वैदिक पद्धतीने जलाभिषेक करण्यात आला. मुख्य कार्यक्रमात स्वर्गीय बन्सीधर झुनझुनवाला यांच्या पुतळ्याचे अनावरण मंगतरायजी तोदी (बिलासपूर) यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या क्षणी आकाशात फटाक्यांची आतिषबाजी व पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. उपस्थित सर्व मान्यवर, ग्रामस्थ, पत्रकार बंधू , शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी उभं राहून श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मंगतरायजी तोदी (नातू, बिलासपूर), सत्यनारायण अग्रवाल (भुरूच), शरदचंद्र अग्रवाल (धामणगाव), मुकुंद नरेडी (परतवाडा) यांची उपस्थिती होती. याशिवाय कार्यक्रमाला लोकप्रिय आमदार प्रकाशभाऊ भारसाकळे, अमितजी अग्रवाल, विजय कौशल यांची सुद्धा प्रमुख उपस्थिती लाभली.
ठरल्या प्रमाणे कार्यक्रमात
मंगतरायजी तोदी यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष गोपालदाजी मल्ल यांनी सपत्नीक केले.
सत्यनारायण अग्रवाल यांचे स्वागत विठ्ठलराव खरोडे,
शरद अग्रवाल यांचे स्वागत अश्विनीताई खरोडे व अनिल अग्रवाल,
बेनिप्रसाद झुनझुनवाला यांचे स्वागत राजेंद्र कोरडे यांनी केले.
कार्यक्रमात प्रेरणादायी भाषणेही झाली.
मंगतरायजी तोदी यांनी आपल्या भाषणात आजोबांच्या कार्याचा गौरव करत संस्थेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.
आमदार प्रकाशभाऊ भारसाकळे यांनी संस्थेच्या सामाजिक योगदानाचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अमित अग्रवाल, सत्यनारायण अग्रवाल, शरद अग्रवाल, विजय झुनझुनवाला, माजी अध्यक्ष राजेंद्र शाह यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. शताब्दी महोत्सव समितीचे सदस्य आशिष झुनझुनवाला यांनी अध्यक्ष व संचालक मंडळाचे आभार मानत या स्मारकाचे महत्त्व स्पष्ट केले.
कार्यक्रमांमध्ये अध्यक्षीय भाषण गोपालदाजी मल्ल, प्रास्ताविक विठ्ठलराव खरोडे,
उत्कृष्ट सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक मुकुंद सोनीकर,
तर आभार प्रदर्शन प्रदीपजी राऊत यांनी केले.
या वेळी दहिगाव येथील प्रतिष्ठित नागरिक अरविंद अवताडे, जगन्नाथ बोरसे, ज्ञानदेवराव घंगाळ, प्रशांत अवताडे, वासुदेवराव महाले यांनी सेठ बंन्सीधर झुनझुनवाला यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
कार्यक्रमादरम्यान झुनझुनवाला परिवाराचे तथा त्यांच्या नातेवाईकांचे सन्मानचिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. अनावरण सोहळ्यानंतर झुनझुनवाला परिवाराच्या वतीने तीनही विभागांतील तब्बल सहा हजार विद्यार्थ्यांना, शिक्षकवृंद व निमंत्रितांना स्नेहभोजनाचे आयोजन समिती कडून करण्यात आले . बेनिप्रसाद झुनझुनवाला व त्यांच्या कुटुंबीयांनी लेझीम पथकात सहभाग घेत आनंद व्यक्त केला. याप्रसंगी डॉ. विक्रमजी जोशी, शिवम पाडिया, ओमप्रकाश झुनझुनवाला, विष्णूजी मल्ल, अश्विनीताई खरोडे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पुतळ्याचे अनावरण करणे हे केवळ औपचारिक कार्य नसून , संस्थेच्या मूल्यांचा, संस्कारांचा आणि कार्याचा गौरव आहे असे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले. शताब्दी वर्षात संस्थापकांच्या स्मृतीला अजरामर करणारा हा दिवस तेल्हारा परिसरासाठी ऐतिहासिक दिवस ठरला.



