धाड महिला सरपंचाला शिवीगाळ

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा
धाड, येथील महिला सरपंचाला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार सरपंच सावित्रीबाई बोर्डे यांनी धाड पोलिसात दिली होती. परंतु दोषीवर कारवाई झाली नसल्याने समाज बांधवांनी धाडसी ठाणेदार मनीष गावंडे यांना 4 सप्टेंबर रोजी निवेदन देऊन कारवाईची मागणी केली. गावातील महिला सरपंचांनी ग्रामपंचायत कार्यालयात त 31 ऑगस्ट रोजी मासिक सभेचे आयोजन केले होते. यावेळी माजी सरपंच व विद्यमान ग्रा.पं. सदस्यांनी जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्याचा प्रयत्न तक्रारीत नमूद आहे. या संदर्भात महिला सरपंचांनी डाळ पोलिसांवना तक्रार दिली आहे. मात्र पोलिसांनी आरोपींवर कुठल्याही प्रकारचे गुन्हे दाखल केले नाही. या घटनेचा धाडसह परिसरातील समाज बांधवांनी निश्चित करत धाड पोलीस ठाण्यात ठाणेदार मनीष गावंडे यांना घेराव घालत रोष व्यक्त केला.🖊️



