बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

मल्हार नगर परिसरातील रस्ता व नालीच्या कामांसाठी स्थानिक रहिवासी तर्फे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:– शंकर शिवरकर

देऊळगावराजा : नगर परिषद हद्दीतील सर्व्हे क्र. ६९/१ मधील मल्हार नगर परिसरात डी.पी. रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण, सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी नालीचे बांधकाम तसेच पावसाळ्यात नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन तात्पुरत्या स्वरूपात रस्त्यावर मुरूम टाकण्याची मागणी करण्यात आली.
मल्हार नगर परिसरात गेल्या १४ वर्षांपासून रस्ता आणि नालीचे कोणतेही ठोस काम झालेले नाही. प्रत्येक पावसाळ्यात नागरिकांना चिखल, साचलेले पाणी, दुर्गंधी आणि डासांच्या प्रादुर्भावाचा सामना करावा लागतो. अनेक वेळा निवेदने देऊनही प्रश्न प्रलंबितच आहे. आता प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने काम सुरू करावे, ही आमची माफक अपेक्षा आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे.”

याबाबत परिसरातील रहिवाशांच्या वतीने नगर परिषद मुख्याधिकारी तसेच नगराध्यक्षा यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात पावसाळ्यात रस्त्यावर चिखल, पाणी साचणे, सांडपाण्यामुळे दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव तसेच विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि वाहनचालकांना होणाऱ्या अडचणींचा उल्लेख करण्यात आला आहे.

या समस्यांची तातडीने दखल घेऊन रस्ता व नालीची कामे मंजूर करून लवकरात लवकर सुरू करावीत, अशी मागणी करण्यात आली. तसेच प्रभागातील सर्व नगरसेवकांनीही या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन नागरिकांना न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

जरी मागणी पूर्ण नाही झाली तर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. असा निवेदन करते यांनी व्यक्त केली
निवेदन देताना उपस्थित. अशोक शिवरकर, सुरेश मारुती शिवरकर, किशोर मारुती शिवर, विनोद शिवरकर,अरुण शिवरकर ,बाबू शिवरकर, पवन शिवरकर, अमरीश शिवरकर, शिवलाल शिवरकर, संभाजी शिवरकर, यांच्या उपस्थितीत निवेदन सादर करण्यात आला

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button