गुरुशिष्य जयंती उत्सवातूनविद्यार्थी प्रबोधन:अनिल सोळंके जि.प.मुख्यध्यापक

महात्मा फुले-डॉ.बाबासाहेब आंबेडकर गुरू-शिष्य जयंती उत्सव
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगांव : – महात्मा ज्योतिबा फुले-डॉ. बाबाबसाहेब यांचा संयुक्त जयंती उत्सव 11एप्रिल ते 14 एप्रिल पर्यंत मालेगाव तालुक्यातील जांभरूनवाडी येथे जी.प.शाळेचे मुख्याध्यापक अनिल सोळंके,सरपंच श्री कैलास ठेंगे पाटील,श्री किरनभाऊ मुठाळ,डॉ बाबूराव कांबळे व गुरू शिष्य जयंती उत्सव समिती सदस्य यांनी विविध उपक्रम राबवून साजरा करत विद्यार्थी प्रबोधन केले.महात्मा ज्योतिबा फुले-डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्या गुरू-शिष्य उत्सवाच्या कार्यक्रमा मध्ये वृक्षारोपण,रंगभरण स्पर्धा,गितगायन स्पर्धा,नृत्यस्पर्धा,महिला-सशक्तीकरण व्याख्यान,निबंध स्पर्धा,स्पर्धात्मक परीक्षा,महाआरोग्य शिबिर,रक्ततपासणी,सुमधूर भीम गीतां ची स्वरांजली,ग्राम स्वच्छता अभियान,हर घर तिरंगा अभियान,आकर्षक रांगोळी, मेहंदी स्पर्धा,भव्य शोभायात्रा अशा विविध उपक्रमाचे सादरीकरण करण्यात आले होते.या विविध उपक्रमामध्ये जांभरूनवाडी येथील विद्यार्थी पालकवर्ग यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला व विद्यार्थ्यांचा उत्साह वाढण्यासाठी त्यांना बक्षीस सुद्धा देण्यात आले.यातील विविध उपक्रमाला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या.त्यामध्ये माजी.आ.विजयराव जाधव,भाजप नेते राजू पाटील राजे,गजाननराव देवळे,खासदार संजय धोत्रे यांचे चिरंजीव अनुप धोत्रे,स्वीयसहाय्यक प्रदीप पाटील नंदापुरे,भाजप ता.अध्यक्ष सुरेश मुंडे,गजानन नवघरे,पवण इंगळे,संजय देशमुख,कृष्णा भाऊ देशमुख,प्रा.सुधीर गोळे,व्याख्यानकार प्रा.अशोक बांगर बीड,प्रा.कपिल ढोके,प्राचार्य प्रकाश कापुरे,आदींचा समावेश होता.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व जांभरूनवासी व श्री अनिल भाऊ मानमोठे वाघळुद,विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.



