महाराष्ट्रराजकीय

आमदारांच्या शपथविधीआधी मविआला धक्का, मित्र पक्षाने सोडली साथ

स्टार भारत लाईव्ह पहुरकर प्रतिनिधी मुंबई :
विधानसभा निवडणूक निकालानंतर आता राज्यात सरकार स्थापन झालंय. पहिल्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झालीय. विरोधकांनी ईव्हीएम विरोधात आवाज उठवत सभात्याग केला. दरम्यान, महाविकास आघाडीला आमदारांच्या शपथविधी आधी मोठा धक्का बसला आहे. मविआच्या मित्र पक्षाने वेगळी वाट धरली असून शिवसेनेचं धर्मांध राजकारण आम्हाला पटत नसल्याचं म्हटलंय. मविआचा मित्रपक्ष समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी मी मविआसोबत राहणार नाही असं स्पष्ट केलं.

धर्मासंदर्भात, विशिष्ट समाजाबद्दल बोलेल अशा लोकांसोबत आम्ही राहू शकत नाही. आम्ही कोणालाही पाठिंबा देणार नाही. आम्ही एकटेच राहू अशी स्पष्ट भूमिका समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांनी सांगितलं. मविआने आज आमदारकीच्या शपथविधीवर बहिष्कार टाकला असला तरी अबू आझमी यांनी आमदारकीची शपथ घेतली. आपण मविआत राहणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button