बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

श्री सद्गगुरू श्रीधर महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रीमद् भागवत महापुराण कथेचे आयोजनजी डी रोकडे बुलढाणा प्रतिनिधी

प्रतिनिधी खामगाव श्री सद्गुरु श्रीधर महाराज यांच्या 50 व्या पुण्यतिथीनिमित्त 5 ते 12 जुलै २६ या कालावधीत श्रीमद् भागवत महापुराण कथेचे आयोजन व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन घाटपुरी येथील सद्गुरु श्रीधर महाराज मंदिरात आयोजित करण्यात आले आहे .
श्रीमद् भागवत कथेचे वाचन संदिपान आश्रम निमगावचे वेदांतचार्य 1008 स्वामी वासुदेवानंद सरस्वती हे आपल्या अमृतवाणीतून करणार आहे. दररोज पहाटे 5 ते 6 काकड आरती. सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ व रात्री 8 ते 10या वेळात विविध कीर्तनकारांची श्रीहरी कीर्तने आयोजित करण्यात आली आहे. भागवत कथेची वेळ सकाळी 10ते दुपारी 1 व दुपारी 3ते 5 अशी ठेवण्यात आली आहे. 5 जुलै रोजी येथील हभप गावंडे महाराज निपाणाकर.6रोजी आळंदी येथील हभप अरुण महाराज घोराडे .7रोजी बेलुरा येथील भागवताचार्य हभप .महेश महाराज मारवाडी .8रोजी अलमपूर येथील भागवताचार्य हभप रामदास महाराज तायडे. 9रोजी बरफगाव येथील शिवाजी महाराज झांबरे.10 रोजी फुली येथील हभप विनायक महाराज सातव. 11 रोजी खामगाव येथील हभप धर्माजी महाराज (गुरुजी ).12 रोजी सकाळी 9 वाजता गाडेगाव . खू.येथील वेदांतचार्य पुरुषोत्तम महाराज बावस्कर यांचे काल्याचे किर्तन आयोजित करण्यात आले आहे. त्याच दिवशी दुपारी 2 ते 6 या वेळात गावातून रथ. गज. अश्वदिंडी. पथकासह श्रींची मिरवणूक काढण्यात येणार आहे .यामध्ये टाळकरी वारकरी सहभागी होणार आहेत .भाविक भक्तांनी भागवतकथा श्रवणाबरोबरच इतर धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री सद्गुरू श्रीधर महाराज संस्थान घाटपुरी यांच्या विश्वस्व मंडळ यांनी केलेला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button