बुलढाणामहाराष्ट्र

पत्रकारांना धमकी देणाऱ्या खासदारावर गुन्हा दाखल करा!

स्टार भारत लाईव्ह एकसप्रेस
अरुणा दत्तात्रय खंडागळे
चिखली तालुखा: प्रतिनिधी

पत्रकार संरक्षण कायद्यान्वये कठोर कारवाईच्या मागणीसाठी चिखली तालुका पत्रकार संघाचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांना चिखली पोलीस स्टेशनमार्फत निवेदन

चिखली ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ करत मारहाणीची धमकी दिल्याच्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत त्यांच्याविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्यान्वये तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ अंतर्गत चिखली तालुका पत्रकार संघाच्या वतीने शुक्रवारी (दि. 26 जून) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिखली पोलीस स्टेशनमार्फत निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, खासदार संजय दिना पाटील यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या वादग्रस्त विधानाबाबत स्पष्टीकरण विचारले असता पत्रकारांना अर्वाच्य शिवीगाळ केली तसेच “पुन्हा विचारायला आलात तर मारून पाठवीन” अशी उघड धमकी दिली. हा प्रकार लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर थेट हल्ला असून पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला बाधा आणणारा आहे.
  पत्रकारांना निर्भयपणे कर्तव्य बजावता यावे, यासाठी पत्रकार संरक्षण कायद्यासह लागू असलेल्या कायद्यांनुसार संबंधित खासदाराविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी शासनाने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
   चिखली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नितीन फुलझाडे यांच्या नेतृत्वाखाली सदर निवेदन चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ ठाणेदार भूषण गावंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button