सततच्या नापिकीला कंटाळून आसलगाव तालुका जळगाव जामोद येथील अरुण दयाराम बघे यांचे आत्महत्या

संग्रामपूर तालुका प्रतिनिधी भगवान पाखरे
आसलगाव तालुका जळगाव जामोद येथील शेतकरी अरुण दयाराम बघे वय वर्ष 52 यांनी सततच्या नापिकीला कंटाळून अखेर जीवन यात्रा संपविली आज पर्यंत अरुण दयाराम बघे यांनी संसाराचा गाडा हाकत हाकत इथपर्यंत आणला
मुलीचे लग्न मुलाचे शिक्षण व संसाराचा बोजा वाहत वाहत आपली जीवन यात्रा संपवली त्यांच्यावर भारतीय स्टेट बँक शाखा जळगाव जामोद बँकेचे 89 हजार रुपये कर्ज आहे आणि बँक आता कर्ज देणार नाही या निराशा पोटी त्यांनी आत्महत्या केली असावी असा समाज बांधवात सूर उमटत आहे अरुण दयाराम बघे यांच्या घरची परिस्थिती अतिशय गरिबीची आहे त्यांना शासनाने जास्तीत जास्त भरीव मदत करावी असे आवाहन संग्रामपूर तालुका बेलदार समाज अध्यक्ष तथा पत्रकार भगवान पाखरे यांनी केले त्यांच्या पश्चात
आई पत्नी मुलं मुली असा आप्त परिवार आहे



