खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्र
धक्कादायक : मुलाला पळवण्याच्या संशयावरून अनोळखी तरुणाला जमावानकडून बेदम मारहाण; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू…!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
जळगाव तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. तसेच इतर अनोळखी व्यक्तींविरुद्धही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.या घटनेमुळे पुन्हा एकदा जमावाकडून कायदा हातात घेण्याच्या प्रकारांबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. कोणतीही खात्री न करता केवळ संशयावरून एखाद्या व्यक्तीला मारहाण करणे आणि त्यात त्याचा मृत्यू होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. सध्या पोलिसांकडून या संपूर्ण घटनेचा सखोल तपास केला जात असून पुढील कारवाई काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



