अंगावरची हळद सुकली नसताना तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू! सून गावात शोककळा….

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी
प्रकाश दांडगे (जळगाव जामोद)
जळगाव जामोद: जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना 22 मे रोजी वरवट बकाल येथे घडली .मृतक तरुणाचा विवाह होऊन अवघे १६ दिवस झाले होते. या दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सुनगाव येथील रहिवासी संदीप शेषराव तेडू (3० वर्ष) असे मृतकाचे नाव आहे. त्याचा विवाह गावातीलच तरुणीसोबत ५ मे रोजी झाला होता. संदीप हा नेहमीच प्रमाणे वरवट बकाल येतील बस स्थानकावरील त्याचे कलरचे दुकान उघडून काम करीत होता. त्यादरम्यान दुपारचे जेवण झाल्यानंतर त्याला दुकानातच सर्पदंश झाला. त्यामुळे नातेवाईकांनी त्याला खाजगी रुग्णालयात नेले. त्यानंतर त्याला उपचारानंतर परत घरी आणले. परंतु थोडावेळाने त्याची तब्येत खालावली. त्यामुळे त्याला तातडीने शेगाव येथे उपचारासाठी हलविले, मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला. रात्री उशिरा सुनगाव येते पार्थिवावर अत्यसंस्कार करण्यात आला.



