जळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्र

भोई समाज मदत संस्थेतर्फे स्वर्गीय महादेव पांडुरंग अमझरे यांच्या पीडित परिवाराला 15000 रुपये ची आर्थिक मदत

 स्टार भारत लाइव बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतीनीधी ऋषिकेश देठे 

भोई समाज मदत संस्था महाराष्ट्र🚩 *(केस क्रं १८) मदतीची हात पोहचला *कै. महादेव पांडूरंग अमझरे वय ४० वर्ष रा. पातुर्डा ता. संग्रामपूर जि. बुलढाणा* यांचे दि ०७/१२/२०२३ रोजी अपघाती निधन झाले होते ते घरातील कर्त पुरुष होते त्यांच्या मागे पत्नी एक मुलगा, एक मुलगी असा आप्त परीवार आहे . त्यांच्या अकाली जाण्यामुळे आर्थीक परिस्थिती खूप हालाखीची झाली आहे, भोई समाज मदत संस्थेचे समन्वयक यांनी पिडीत कुटुंबाचे सत्य परिस्थितीचे निरीक्षण करून आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्या अनुषंगाने दि १ आॅगस्ट २०२४ रोजी भोई समाज बांधवाना मदतीचे आवाहन करण्यात आले होते


आज दि १८ अॉगस्ट २०२४ रोजी कै महादेव अमझरे यांच्या पत्नीकडे मदतीची रक्कम १५००० सोपविण्यात आली त्या प्रसंगी भोई समाज मदत संस्थेचे समन्वयक श्री उमेश सुरेश राजगुरे भोई समाज युवा मंच विदर्भ अध्यक्ष, श्री महादेव नामदेव कुरवाडे, श्री विनोद रमेश मेसरे, श्री सुभाष साटोटे, श्री अजय शालीग्राम कुरवाळे, श्री रमेश नांदणे ,श्री भागवत नांदणे, श्री विजय शहादेव अमझरे, श्री मारोती बोरवार, श्री रविंद्रभाऊ मात्रे, श्री पुर्णाजी कुरवाळे, श्री अंकुश लक्ष्मण कुरवाळे, श्री श्रीकृष्ण मारोती अमझरे, आदी समाज बांधव उपस्थित होते
भोई समाज मदत संस्थे तर्फ भोईसमाज बांधवांचे आभार मानण्यात आले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button