क्राईमगुन्हेगारीजळगावा जिल्हाभुसावळ

भुसावळात घरफोडी करणाऱ्या चोरट्यास अटक; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

भुसावळ : येथील फातेमा कॉलनी परिसरात बंद घराचे कुलूप तोडून ५ लाख ७० हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड लंपास करणाऱ्या आरोपीला भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत अटक केली. त्याच्याकडून ४ लाख ९९ हजार १०० रुपये किम तीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.फिर्यादी वसीम अहमद अब्दुल बासीद शेख (रा.फातेमा कॉलनी, भुसावळ) हे २८ ते ३० मार्च दरम्यान आपल्या घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात शिरून ५ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.दरम्यान, पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी गुन्ह्याचा तपास करण्यासाठी डी.बी. पथकाला सूचना दिल्या होत्या. तपासादरम्यान पोलीस निरीक्षक वाघ यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पोलिसांनी अमीर खान हबीब खान (वय-३५, रा. न्यू ईदगाहजवळ, भुसावळ) याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच आमिर खान याने एका विधी संघर्ष बालकाच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेल्या मालापैकी ४ लाख ९९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे, विजय नेरकर, कांतीलाल केदारे, योगेश माळी, भूषण चौधरी, अमर अढाडे, दिलीप कोल्हे, चंद्रकांत रायपूरकर, अक्षय कोतकर, प्रशांत सोनार, जीवन कापडे, जावेद शहा, सचिन चौधरी, महेंद्र पाटील आणि हर्षल महाजन आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button