बुलढाणामहाराष्ट्र

भारत स्वाभिमान स्थापना दिन संत नगरीमध्ये सोत्साह संपन्न

*भारत स्वाभिमान स्थापना दिन संत नगरीमध्ये सोत्साह संपन्न* स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलढाणा जिल्हा ग्रामिण प्रतीनीधी ऋषिकेश देठे *शेगाव- भारत स्वाभिमान स्थापना दिवस पतंजली परिवार बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने भारत स्वाभिमान राज्य प्रभारी दिनेशजी राठोड यांच्या अध्यक्षतेखाली व दत्तात्रयजी काळे किसान सेवा समिती राज्य प्रभारी, शंकरजी नागापुरे युवा राज्य प्रभारी, संजयजी चापले राज्य कार्यकारणी सदस्य, रमेशजी भट्टड, राजेंद्र शेगोकार, दिलीपजी इंगळे, डॉ.ज्ञानेश्वरजी मिरगे, विलासजी डेहनकर सर, सुहासजी काटे जिल्हा प्रभारी अकोला, हरीशजी माखिजा जिल्हा प्रभारी अकोला, अस्मिता राठोड, मायाताई चव्हाण यवतमाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रल्हाद सुलताने प्रांत सहकोषाध्यक्ष यांनी केले. कार्यक्रमात संतोषराव पाटील व सौ. अनिताताई पाटील मोताळा या दाम्पत्याचा योगपीठ हरिद्वारचे आजीवन सदस्य झाल्याबद्दल व नंदू भाऊ कुलकर्णी, राजेंद्र शेगोकार, अनिलजी उंबरकर, संजयजी ठाकूर, नारायण दाभाडे या पत्रकार बांधवांचा पत्रकार दिनानिमित्त राज्य प्रभारी दिनेशजी राठोड यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. दिनेश जी राठोड व राजेशजी शेगोकार यांनी भारत स्वाभिमान स्थापना दिनाचे महत्त्व विशद करणारी भाषणे झालीत. कार्यक्रम भटृड जीन शेगाव मध्ये संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला हवन करण्यात आले.* *दशरथजी लोणकर जिल्हा प्रभारी पतंजली योग समिती, पुरुषोत्तम पाटील जिल्हा प्रभारी किसान सेवा समिती ,हरिदास सोळंके युवा जिल्हा प्रभारी, विनायकराव भारंबे जिल्हा प्रभारी सोशल मीडिया, सुनिता चांडक महिला जिल्हा प्रभारी, दिलीपजी पीडीयार सहजिल्हा प्रभारी, बाबुराव रोकडे महामंत्री, सौ. वर्षाताई सरप, कल्पनाताई मसने, शोभाताई बाळापुरे, परदेशी ताई ,अर्जुनराव गारोळे मेहकर, खामगाव, संग्रामपूर, नांदुरा ,चिखली, जळगाव तालुक्या

तील पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन विठ्ठलराव मिरगे सर यांनी केले. आभार प्रदर्शन निळकंठराव साबळे यांनी केले. यशस्वीतेसाठी पतंजली परिवारातील महिला व पुरुषांनी अथक परिश्रम घेतले

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button