बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

भारतीय बौद्ध महासभा पदाधिकारी यांची ग्रंथ भेट.प्रवचन मालिका राबविण्यात आली.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
संग्रामपूर प्रतिनिधी
संगीता उमाळे.
दि.८/९/२०२६.

गेल्या महिन्यापासून भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीचे तालुका पदाधिकारी तसेच जिल्हा पदाधिकारी अहोरात्र संपूर्ण संग्रामपूर तालुक्यामधील गावोगावी जाऊन धम्मग्रंथाला भेट देण्याचे कार्य करीत आहेत. याच दरम्यान आज संग्रामपूर तालुक्यातील बोडखा येथील धम्म ग्रंथला भेट देण्यात आली आहे.

प्रथमता महाकारूणी तथागत गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प. धूप. दीप प्रज्वलित करून त्रिशरण आणि पंचशील घेण्यात आले.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचक आयु. किसनराव उमाळे यांनी ग्रंथाचे वाचन करून अनुग्रहण करण्यात आले. नंतर बौद्धाचार्य मिलिंद वानखडे यांनी तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित प्रवचन करण्यात आले.
यावेळी बुद्ध विहारात विशाखा महिला मंडळ आणि युवा भिम क्रांती मंडळ उपस्थित होते. तसेच लहान मुलं आणि मुली हजर असता एका चिमुकल्या आयु विश्वजीत शेषराव उमाळे. यानी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे खूप छान गीत सादर केले. विशेष म्हणजे या मुलाला दोन्ही डोळ्यांनी दिसत नसल्यामुळे आलेल्या पाहुण्यांनी त्याचे कौतुक करून त्याचे स्वागत करण्यात आले. भारतीय बौद्ध महासभा जिल्हा पदाधिकारी व वंचित बहुजन आघाडी तालुका पदाधिकारी आयु. किशोर भाऊ भिडे हे या ठिकाणावर काही कारणास्तव हजर नसल्यामुळे त्यांनी विश्वजीतला व्हिडिओ कॉन्फरन्स वर अभिनंदन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आयु. भाऊराव गव्हांदे संग्रामपूर प्रभारी तथा जिल्हा संघटक.
बौद्धाचार्य मिलिंद वानखडे जिल्हा संस्कार सचिव.
दीपक भाऊ पहूरकर महासचिव वंचित बहुजन आघाडी.
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस चे प्रतिनिधी रतन भगत सर उपस्थित होते.

सर ते शेवटी सर्वांनी सरणतय गाथा घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला…….✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button