आझाद समाज पार्टी (कां) पक्षात सुजित बांगर यांच्या सह सहकाऱ्यांचा पक्ष प्रवेश…..!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
संग्रामपूर:- २४ जून २०२६
आज दि. 23 जून रोजी अमरावती येथील पक्षाच्या कार्यालयात महाराष्ट्र राज्यातील पक्षाच्या नेत्यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
आझाद आजाद समाज पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष,खासदार अँड.भाई चंद्रशेखर आजाद यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून,महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष मनिष साठे यांच्या नेतृत्वात अमरावती येथील महाराष्ट्र राज्य प्रदेश जनसंपर्क कार्यालयात बुलढाणा जिल्ह्यातील शिव-फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतील लढाऊ युवा नेते सुजित बांगर,विजय इंगळे,सागर मोरे यांचा आजाद समाज पार्टी (कांशीराम) या पक्षामध्ये पक्ष प्रवेश झाला.
यावेळी पक्षाचे नेते महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अरविंद कांबळे तथा मराठवाडा प्रभारी व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ देवरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
सामाजिक व राजकीय जीवनात सदैव अग्रेसर असल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.



