चिंचखेड येथील कु. क्षमा भांबेरेची पीएसआयपदी निवड

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर
शेगाव तालुक्यातील चिंचखेड गावातील सामान्य कुटुंबातील कु. क्षमा विठ्ठल भांबेरे या युवतीने पोलीस उपनिरीक्षक या परीक्षेत बाजी मारली आहे. अत्यंत पितृक्षत्र लहानपणीच हरवले असताना मोठ्या जिद्दीने पोउपनिरी क्षमा यांनी चिंचखेड शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केले तर माटरगाव जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
नॅशनल कॉलेज खामगाव येथे बारावीपर्यंत तर पदवीचे शिक्षण त्यांनी महिला महाविद्यालय खामगाव येथे पूर्ण करून पाच वर्षापासून त्या स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत २०२० ला दिलेल्या
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा त्यांनी दिली होती. मात्र तीन वर्षापासून प्रलंबित असलेला तो निकाल नुकताच जाहीर झाला. क्षमा यांची निवड पोलीस उपनिरीक्षक पदी झाल्याने चिंचखेड गावात त्यांचा चिंचखेड ग्रामपंचायतच्या वतीने ५ जुलै रोजी सत्कारही करण्यात आला. यावेळी सरपंच मनकर्णाताई डुकरे, उपसरपंच नारायण भांबेरे, सदस्य रवींद्र डुकरे, पुरुषोत्तम भांबेरे, प्रशांत भांबेरे, सुनील भांबेरे, विशाल चोपडे, आशिष भामरे यांचेसह शिवसेना तालुकाप्रमुख रामेश्वर थारकर, उपजिल्हाप्रमुख राजू पाटील मिरगे यांनीही त्यांचा सत्कार केला. क्षमा यांनी बीएड सुद्धा पूर्ण केले आहे. त्यांच्या यशाने मुलीं पुढे एक आदर्श निर्माण
केला आहे



