बौद्ध समाजाने बैल पोळ्यामध्ये बैल आणल्यामुळे जातिवादक शिवीगाळ आणि भाला. काठीने मारहाण.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
संग्रामपूर प्रतिनिधी
संगीता उमाळे.
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील शेवगा खुर्द (शेतखेडा) येथे स्मशानभूमीच्या जुन्या वादावरून १० सप्टेंबर 2026 होण्याच्या दिवशी दोन गटात हिंसक हाणामारीची घटना घडली.
गावातील स्मशानभूमीच्या जागेचा जुनावाद उफाळून आल्याने दोन्ही गटातील नागरिक बैलपोळ्या निमित्ताने आमने सामने आले असता बौद्ध समाजाला नागडे करून त्यांची धिंड काढा अशा धमक्या दिल्या. तसेच जाती वादक शिवीगाळ करण्यात आली. या वादातून हाणामारीचे स्वरूप आले.
दगड. विटा . लाटा काठीने मारहाण करण्यात आली. यामध्ये अनेक जणांना गंभीर दुखापत झाली. जास्त घायल झालेल्या पाच जणांना अकोला रुग्णालयामध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले.
या प्रकरणी तामगाव पोलीस स्टेशनला दोन्ही गटाविरुद्ध 40 जना विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. शेवगा खुर्द (शेतखेडा) येथे राहणारे प्रकाश किसन डोंगरदिवे वय 48 यांच्या तक्रारीवरून गावातील स्मशानभूमीच्या जागेवरून दोन समाजामध्ये याआधी वाद झाला होता. याच वादातून बदल्याची क्रूर भावना मनात घेऊन बौद्ध समाजाला मारहाण केली. या तक्रारीवरून पोलिसांनी गणेश मधुकर पिवतकार वय 30. गजानन मधुकर वय 32. निंबाजी आडे वय 40. ओम निंबाजी आडे वय 22. मधुकर मेन कार वय 37. हर्ष मधुकर मेनकर वय 19. शुभम विष्णू सोनोने 32. मनोज विष्णू सोनोने वय 30. अभिजीत विष्णू सोनोने वय 25, गोपाळ सोनोने वय 50 , सौरभ भगवान सोनोने वय 22, केशव बाबन वय 45, सूर्यकांता निंबाजी आडे वय 35, राधाबाई भगवान सोनोने वय 50, इंदुबाई भगवान सोनोने वय४९, शालिनी गजानन पीवतकार वय 27, गायत्री गणेश पिवतकार वय 22, मनोज सोनोने वय 25, विजयकांत मधुकर मेहकर वय २०, आणि प्राची भगवान सोनोने वय 20 , यांचे विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
दुसऱ्या गटातील अभीत विष्णू सोनोने वय २३, यांनी दिलेल्या तक्रातीवरून विस जनाविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
यामध्ये आनंदा किसन डोंगरदिवे. विकी रमेश खंडेराव. आदित्य कैलास डोंगरदिवे. आकाश कैलास डोंगर दिवे. प्रकाश किसन डोंगरदिवे. रमेश महादेव खंडेराव. राष्ट्रपाल वानखडे. सचिन देविदास वानखडे. धम्मपाल किसन डोंगरदीवे. विश्वपाल वानखडे. रोहित ज्ञानदेव मेहेरे. नलिनी प्रकाश डोंगरदिवे. चंदा कैलास डोंगरदिववे. अंतकला किसन डोंगरदीवे. कविता आनंदा डोंगरदिवे. रमा धम्मपाल डोंगर दीवे. देवाबाई रमेश खंडेराव व अक्षय रमेश खंडेराव यांचा समावेश आहे.








