महाराष्ट्र
“बोरखेडी येथे तंटामुक्ती अध्यक्षांची अविरोध निवड “

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
रिसोड : – रिसोड तालुक्यातील बोरखेडी गावातील तंटामुक्ती अध्यक्षांची निवड करण्यासाठी आमसभा बोलावण्यात आली.हि सभा ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आली.यासाठी गणेश रामराव जायभाये यांचे नाव सर्वानुमते आल्यामुळे आणखी विरोधात कुणाचाही अर्ज प्राप्त न झाल्याने हि निवड अविरोध झाली व सर्वांनी सहकार्य केल्यामुळेच शांततेत हि सभा पार पडली.असे ग्रामपंचायतचे सचीव श्री ठाकरे यांनी बोलतांना सांगितले. सरपंच विश्वनाथ जायभाये यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा व निवड करण्यात आली, यावेळी उपसरपंच उद्धव सोनुने, मंगेश आघाव, रामेश्वर वाघमारे, अर्जुन अंभोरे, सचिन जायभाये, योगेश सानप आणी गावातील जेष्ठ ,तरुण सर्वच समाजातील मंडळी यावेळी उपस्थित होती.✍️



