बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

बेराळा गावात  साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे जयंतीचा जल्लोष ; डीजेच्या तालावर भव्य शोभायात्रा ! 

स्टार भारत लाईव्ह एकसप्रेस
चिखली तालुका प्रतिनिधी
अरुणा दत्तात्रय खंडागळे

” महापुरुषांचे विचार आचरणात आणणे हीच खरी आदरांजली ; समाजाने शिक्षण, संघटन व स्वाभिमानाचा मार्ग स्वीकारावा” – भाई छोटू कांबळे
तालुक्यातील बेराळा येथे साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा, जयंती मिरवणूक व अभिवादन सभेचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. सकाळपासूनच गावात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी  डीजेच्या तालावर युवक, युवती, महिला व समाजबांधवांनी जल्लोषात सहभाग घेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या  प्रतिमेला अभिवादन केले. गावातील प्रमुख मार्गावरून निघालेली भव्य मिरवणूक शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. जयभीम, जय शिवराय, जय हिंदूसूर्य महाराणा प्रताप  व अण्णाभाऊ साठे यांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. मिरवणुकीचा समारोप समाज मंदिर परिसरात झाला.

त्यानंतर आयोजित अभिवादन सभेत ग्रामपंचायतीचे सरपंच रामभाऊ सुरडकर, सदस्य समाधान मधुकर सुरडकर, गणेश सुरडकर, पोलीस पाटील पुष्पाताई सुरडकर, माजी सरपंच सुमन मधुकर बोरकर, उपसरपंच संतोष जाधव, सामाजिक कार्यकर्ते दत्ता सुरडकर, बाळू पाटील सुरडकर, बिट जमदार विकास देशमुख, मातंग सेवा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दिलीप काळे, राणा स्वप्नील सुरडकर, माजी उपसरपंच समाधान  सुरडकर, संजय जाधव, राहुल  सुरडकर, सागर परिहार, गणेश  सुरडकर, मनोज गोडवे, महाराष्ट्र पोलीस दलातील अमोल जाधव (जालना), किशोर जाधव (अंढेरा), मातंग सेवा प्रतिष्ठानचे भानखेड शाखाध्यक्ष सोनू गायकवाड, देवानंद अवसरमोल, कृष्णा अवसरमोल यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते तथा मातंग सेवा प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष भाई छोटू कांबळे यांनी आपल्या प्रभावी भाषणात सांगितले की, “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, तर सामाजिक परिवर्तनाचे महान शिल्पकार होते. त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून शोषित, वंचित आणि कष्टकरी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी लेखणीचे शस्त्र उगारले. ‘फकिरा’सारखी अजरामर कादंबरी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी अर्पण करून त्यांनी समतेच्या विचारांना अभिवादन केले. महापुरुषांची जयंती केवळ मिरवणूक किंवा उत्सवापुरती मर्यादित न ठेवता त्यांच्या विचारांचे आचरण करणे, शिक्षणाला प्राधान्य देणे, संघटित राहणे आणि स्वाभिमानाने जगणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.”

यावेळी उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या समतावादी व परिवर्तनवादी विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. मातंग समाजासह ग्रामस्थ, युवक आणि महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत कार्यक्रम यशस्वी केला.

या कार्यक्रमाचे आयोजन शिव-फुले-शाहू-आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती, बेराळा यांच्या वतीने करण्यात आले. समितीचे अध्यक्ष सुधाकर बोरकर, उपाध्यक्ष मनोहर बोरकर, सचिव योगेश बोरकर यांच्यासह सुनील बोरकर, विजय बोरकर, राहुल जाधव, सौरभ जाधव, विशाल जाधव, नवीन जाधव, संतोष जाधव, सुभाष जाधव, राजू जाधव, प्रशांत जाधव, विनोद जाधव, नंदकिशोर बोरकर, प्रल्हाद बोरकर, संतोष बोरकर, गोपाल बोरकर, रामजी साबळे, सागर बोरकर, अमोल बोरकर, आदिनाथ बोरकर, आकाश बोरकर, मनोज बोरकर, दत्ता बोरकर, दिनकर बोरकर, समाधान बोरकर, हरिभाऊ बोरकर, माजी सरपंच मधुकर बोरकर, रितेश जाधव, समाधान टेकाडे, शंकर बोरकर, सागर थोरात, गोरख थोरात, अनिल बोरकर, विजय गायकवाड, अरुण जाधव आणि सिद्धार्थ जाधव यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button