खानदेशजळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्रराजकीयविदर्भ

वंचितने केला !आलेवाडीत आंबेडकरांची ऐतिहासिक सभा

वंचितने केला !आलेवाडीत आंबेडकरांची ऐतिहासिक सभा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसशेगाव प्रतिनिधीं श्याम पहुरकर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर उर्फ बाळासाहेब यांच्या वंचित बहुजन आघाडीने सातपुड्याला गवसणी घातली आहे. बुधवारी १५ मार्च रोजी संग्रामपुर तालुक्यातील ‘आलेवाडी’ येथे भव्य आदीवासी मेळाव्यातुन हे अधोरेखीत झाले, बुलढाणा जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर सातपुडा पर्वत रांगांच्या पायथ्याशी आदिवासी बहुल व मध्यप्रदेशच्या प्रांताशी लागुन ‘आलेवाडी’ गाव आहे, या गावात वंचित बहुजन आघाडीचे अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांची ऐतिहासीक सभा पार पडली. या आदीवासी मेळाव्यालापंचक्रोशीतील आदीवासी पुरुषव महिलांची मोठ्या संख्येने उपस्थीती होती.यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये प्रा.धैर्यवर्धन पुंडकर,बुलडाना जिल्हा संपर्क प्रमुख प्रदीप वानखडे, डॉ. प्रविण पाटील, शरद वसतकार, रामकृष्ण रजाने जिल्हाध्यक्ष गणेश चौकशे, निलेश जाधव, संग्रामपुर ता. अध्यक्ष रविद्र भेलके, जळगाव जा. ता. अध्यक्ष संतोष गवई, महासचिव अनिल ईखारे, आतीषभाई खराटे आदी मान्यवरांची उपस्थीती होती.आदिवासी बांधवाना जंगलातुन बाहेर काढणे हा सरकारचा षडयंत्राचा भाग असून शासनाचा तेथील मौल्यवानवनओषधी, साग, खनिज व नैसर्गिक पाण्यावर डोळा असुन हे सर्व ताब्यात घेण्यासाठी सगळा खटाटोप सुरू आहे, असा घणाघात त्यांनी शासनावर केला.तसेच सरकारला वन्य प्राणयांची एवढी तळमळ असेल तर प्रत्येक गावात पंधरा एक्कर जमीन शासनाने राखीव ठेवावी किंवा अधिग्रहित करावी. असेही ते म्हणाले. मोदी सरकार हे लुटारुचे सरकार आहे. घरातील एक-एक वस्तू विकल्या जात असतांना निदान घर तरी सुरक्षीत राहते की नाही हिच शंका आहे. त्यामुळे आपले घर वाचवायचे असेल तर या सरकारला खाली खेचण्यासाठी जनतेने परिवर्तनाचा विचार करण्याची गरज आहे, असे आवाहनही त्यांनी केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button