बुद्ध आणि धम्म या ग्रंथावर आधारित परीक्षा संपन्न:लहान ग्यासह महिलांचा उत्स्फूर्त सहभाग:

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
संग्रामपूर प्रतिनिधी
संगीता उमाळे.
दि.१६/९/२०२६.
भारतीय बौद्ध महाशाखा धामणगाव गोतमारे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र धम्माचे वाचन. पठाण व मनन चालू आहे. त्यानिमित्ताने या गावामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर लेखी धम्मज्ञान चाचणी परीक्षा घेण्यात आली आहे.
समाजामध्ये धम्म विचारांचा प्रसार व्हावा आणि नवीन पिढीला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे यांच्या विचाराची ओळख व्हावी या उद्देशाने बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथावर आधारित एका विशेष परीक्षेचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमाला समाज बांधवाकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या परीक्षेमध्ये लहान मुला पासून ते महिला पर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. सर्व परीक्षार्थी अत्यंत शिस्तीत आणि एकाग्रतेने पेपर सोडविण्यात आला.
या स्तुत्य उपक्रमामुळे लहान मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यास आणि धम्म तत्त्वज्ञान समजून घेण्यास मोठी मदत होत असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात येत आहे.
यानिमित्ताने ग्रंथवाचक व विश्लेषण तथा परिक्षक,व विद्यार्थी यांचे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा बुलढाणा उत्तर विभाग, संस्कार विभागाच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन केले जात आहे. तसेच परिसरात या शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमाचे भरभरून कौतुक होत आहे…….✍️



