बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

बिग ब्रेकिंग खामगाव: पिंपळगाव राजा सर्कलमध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश!

जी.डी.रोकडे. (जिल्हा प्रतिनिधी)बूथ प्रमुख आणि BLA 2 ची बैठक संपन्न; पक्षसंघटना बळकटीकरणावर भर

खामगाव:खामगाव

तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठ्या गावांपैकी एक असलेल्या पिंपळगाव राजा येथील ‘भारत लॉन’ येथे शिवसेनेचा भव्य मेळावा पार पडला. या मेळाव्यात पिंपळगाव राजा पंचायत समिती सर्कल मधील शेकडो कार्यकर्त्यांनी जाहीर पक्षप्रवेश केला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत बूथ रचना मजबूत करण्यासाठी ३४ ‘BLA 2’ (बूथ लेव्हल एजंट) यांची नियुक्ती करण्यात आली, तसेच कार्यकर्त्यांना SIR सर्वेक्षणाबाबत सविस्तर माहिती देऊन फॉर्म भरून घेण्यात आले.
शिवसेना मुख्यनेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजातील प्रत्येक घटकासाठी घेतलेले कल्याणकारी निर्णय आणि राबवलेल्या योजनांमुळे सर्वसामान्यांपासून ते अनेक नेत्यांचा शिवसेनेकडे ओढा वाढला आहे. तसेच केंद्रीय मंत्री व खासदार प्रतापराव जाधव यांचे सर्वसामान्य नेतृत्व युवकांना आकर्षित करत असून, बुलढाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड आणि शिवसेना संपर्कप्रमुख संजय सोनार, जिल्हाप्रमुख संतोष डिवरे यांच्या सहकार्यातून या भागाकडे विशेष लक्ष दिले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
खामगाव विधानसभेत ‘हिंदू सेवक’ अ‍ॅड. अमोल अंधारे यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्यानंतर आणि त्यांची ‘BLA 1’ पदी नियुक्ती झाल्यापासून मतदार संघात शिवसेना संघटन बांधणीला मोठी गती आली आहे. गावोगावी जाऊन बूथनिहाय आढावा घेतला जात असून उर्वरित नेमणुका तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
आगामी निवडणुकांच्या दृष्टीने बूथस्तरावरील नियोजन, स्थानिक पातळीवरील प्रभावी रणनीती आणि संघटन बळकटीकरण यावर या बैठकीत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून BLA नेमणूक प्रक्रियेतील अडचणी आणि उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
या कार्यक्रमाला शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे, पिंटू पाटील धोरण यांच्यासह नवनियुक्त BLA 2 आणि पक्षात प्रवेश केलेले प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये जबिउल्ला सेठ, अशपाक भाई, केशव बोंबटकर, गजानन दाते, बंटी ठाकरे, हिरालाल माकोडे, भागवत इंगळे, मो. फारुक, रमेश गिरे, रहमान भाई, रईस भाई, राम बावस्कर, गजानन चोपडे, अभिषेक वानखेडे, मंगेश वानखेडे, मुन्ना महाले, रामेश्वर महाले, प्रवीण ठाकरे यांचा समावेश होता.

तसेच पक्षात जाहीर प्रवेश केलेल्यांमध्ये सय्यद जावेद, शेख जाफर, जुबेर खान, मो. शोएब, सलीम खान, सय्यद नकीम, प्रशांत वानखडे, सय्यद मोबिन, युनूस भाई, नूर भाई, मो. साजिद, बबलू भाई यांच्यासह शेकडो शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते…….✒️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button