महाराष्ट्रसामाजिक
झाडेगाव येथे भारुडातून केले भाविकांचे मनोरंजन

भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहूरकर
शेगाव तालुक्यातील झाडेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाच्या समाप्तीनंतर विठ्ठल संस्थान वर सांप्रदायिक भारुडाचे आयोजन केले होते. त्या भारुडात गावातील वारकऱ्यांनी नवरा नवरीचे भांडण.वेडी म्हणतात मला वेडी म्हणतात. लाडाची लेक बाई संताची व लाडाची लेक बाई संताची. टाळ मृदुंग विना गावातील वारकरी व इतरत्र गावातील मंडळी यांनी भारुडाचे आयोजन करून गावातील सर्वांचे मनोरंजन केले. व गावातील सर्वांना एकोप्याने राहण्याचा संदेश दिला. यामध्ये स्त्रियांनी सुद्धा फुगडी घातल्या व अभंगांचे गायन केले.




