जळगावा जिल्हासामाजिक

फिजीओथेरेपी महाविद्यालयातर्फे शिवजयंतीचा उत्साह संचारला

जळगाव जिल्हा प्रतिनिधी

जळगाव दि ३० — डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजीओथेरेपी महाविद्यालयातर्फेही शिवजयंतीनिमीत्त कार्यक्रम घेण्यात आले. डॉ. केतकी पाटील सभागृहात कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्राचार्य डॉ. जयवंत नागूलकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी प्रशासकीय अधिकारी राहुल गिरी, डॉ. अनुराग, डॉ. अंकीता दास, डॉ. अभिलीप्सा उपस्थित होते. डॉ. सुयोग लंकेपिल्लेवाल यांनी शिवगर्जना सादर केली. कार्यक्रमात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी अफजल खान वधाचा देखावा विद्यार्थ्यांनी साकारला. तसेच पोवाडे आणि सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आले. सुत्रसंचालन तेजस्वीनी व्यंकटवार, सृष्टी लाड, हिमानी सोनार यांनी तर आभार अंकीत राऊत याने मानले. यशस्वीतेसाठी सर्वेश पाटील, प्रतिक लहामगे, सुजय मानकर, शिवम राठोड, नीरज सपकाळे, गणेश दुधभाते, पूजा पुरोहित, श्रृती तांबट, सलोनी किर, स्नेहल राठोड, दामिनी तावडे, खुशी पट्टेबहाद्दूर, सुशांत शिसोदे, गौरव पवार, अमृता देशमुख, ओम चौधरी, वैष्णवी दळवे यांनी परिश्रम घेतले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button