प्रा. संजय गायकवाड आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित! बुलढाणा तालुक्यातील खोलवरचे आहेत प्रा. गायकवाड

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा
क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ या समाजाभिमुख संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रा. संजय गायकवाड यांना छत्रपती संभाजी नगर जिल्हा शिक्षण समितीच्या वतीने रविवारी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
बुलढाणा तालुक्यातील कोलवड हे प्रा. संजय गायकवाड यांचे मूळ गाव आहे. त्यांचे वडील दिवंगत शिवाजी गायकवाड हे मुख्याध्यापक होते. आदर्श शिक्षक म्हणून त्यांची ख्याती होती. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत प्रा संजय गायकवाड यांनी शिक्षण, समाजकारणात स्वतःला झोकून दिले आहे. सध्या ते सरस्वती भुवन महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहेत. सेवा .शिस्त .समर्पण हे त्यांचे विशेष गुण आहेत. इंग्रजी सारखा अवघड विषय सहज, सुलभ व सरल पद्धतीने समजावून सांगण्याची त्यांची अनोखी व विलोभनीय हातोटी आहे.



