शेतकरी व विद्यार्थ्यांसाठी केलेले निर्णय कौतुकास्पद व ऐतिहासिक

शेतकरी व विद्यार्थ्यांसाठी केलेले निर्णय कौतुकास्पद व ऐतिहासिक — आ अँड आकाश फुंडकर खामगाव ::–
स्टार भारत लाइव महाराष्ट्र एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे
भाजप शिवसेना युतीचे सरकार हे शेतकरी व गोरगरिबांचे आहे हे पुन्हा एकदा कालच्या कॅबिनेट बैठकीत झालेल्या निर्णयामुळे सिद्ध झालेले आहे, विशेषतः शेतकऱ्यांसाठी भरीव आर्थिक मदत व विद्यार्थ्यांसाठी घेतलेले निर्णय कौतुकास्पद व ऐतिहासिक आहे अशी प्रतिक्रिया भाजप जिल्हाध्यक्ष तथा आ अँड आकाश फुंडकर यांनी दिली आहे. 13 जून रोजी राज्य मंत्रीमंडळाची बैठक झाली. यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. यामध्ये विशेषतः शेतकरी जो सततच्या अवकाळी पावसाने त्रस्त झाला होता, अश्या सर्व शेतकऱ्यांसाठी 1500 कोटी रुपये नुकसान भरपाई म्हणून जाहीर केले. आणि ही भरपाई तातडीने शेतकऱ्यांना पोहचविण्याचे सुद्धा आदेश दिलेत. तसेच विद्यार्थ्यांसाठी तर ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. इयत्ता 5 वी ते 10 च्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीत तब्बल पाच पट वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता 5 ते 7 वी च्या विद्यार्थ्यांना 1 हजाराहून 5 हजार, तर 8 ते 10 वीच्या विद्यार्थ्यांना 1हजार 500 वरून 7 हजार 500 रुपयांची शिष्यवृत्ती रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. यासह अनुसूचित जाती प्रवगातील विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती साठी नवीन सुधारित कार्यप्रणाली राबविण्यात येणार आहे. यामध्ये एक अभ्यासक्रम एक शिष्यवृत्ती हे धोरण लागू करण्यात येणार आहे, तसेच विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी समुपदेशक नियुक्त करण्यात येणार आहे. याची अंमलबजावणी याच 2023 – 24 च्या शैक्षणिक वर्षात लागू होणार आहे. आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला , राज्यातील कंत्राटी ग्रामसेवकांना याआधी केवळ 6 हजार मानधन देण्यात होते. यात आता तब्बल 10 हजारांची वाढ केली आहे, त्यामुळे त्यांचे मानधन आता 6 हजारावरून 16 हजार झाले आहे. यासह इतरही चांगले निर्णय घेण्यात आले. या निर्णयामुळे पुन्हा एकदा भाजप शिवसेना युतीचे गतिमान सरकार शेतकरी व गोरगरीब यांचे आहे हे सिद्ध झाले आहे, अशी प्रतिक्रिया आ अँड आकाश फुंडकर यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयावर दिली आहे.



