महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने उत्पादित केलेल्या वस्तू व खाद्यपदार्थांचे भव्य दिव्य प्रदर्शनाचे उद्घाटन समारोह संपन्न……. बुलढाणा.

.(जी .डी .रोकडे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी) 25 मार्च रोजी स्थानिक बुलढाणा येथे जिजामाता प्रेक्षागार येथे महिला आर्थिक विकास महामंडळ बुलढाणा यांच्या वतीने नऊ तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. खासदार प्रतापराव जाधव आणि आणि जिल्हाधिकारी ह. तू मोड साहेब यांच्या हस्ते भव्य प्रदर्शनी आणि विक्रीचे उद्घाटन करण्यात आले. सुरुवातीला मा जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला . यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले तीन दिवस चालणाऱ्या ह्या भव्य प्रदर्शनी मध्ये शंभराहून अधिक महिला बचत गटांनी सहभाग नोंदला आहे या बचत गटांनी स्वतः उत्पादित वस्तू आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले आहेत. नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे………



