पि एम श्री जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळा माळेगाव बाजार येथे संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन*

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
संतोष गिऱ्हे माळेगाव बाजार
26 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण भारतभर संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. हे वर्ष संविधान दिनाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. संविधान दिनानिमित्त जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळा माळेगाव बाजार येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सुरुवातीला शाळेमध्ये भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केंद्रप्रमुख सुरेश खोडे मुख्याध्यापक सचिन ठोंबरे विशेष शिक्षक प्रफुलजी चिमणकर ज्येष्ठ शिक्षिका उषाताई बोरेकर व इतर सर्व शिक्षक शिक्षिका यांच्या हस्ते संपन्न झाले. संविधानातील मूल्यांबद्दल जागृती व्हावी म्हणून न्याय समता बंधुता धर्मनिरपेक्षता व एकता यांचा विद्यार्थ्यांमध्ये परिपोष व्हावा म्हणून मानवी साखळी तयार करून विविधतेत एकता हा संदेश संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून देण्यात आला त्यानंतर गावामधून प्रभात फेरी काढण्यात आली ग्रामपंचायत कार्यालयाजवळ राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांचे पूजन सुरेश खोडे सर पत्रकार संतोष भाऊ गिऱ्हे यांच्या हस्ते घेण्यात आले. विद्यार्थिनींनी सादर केलेले पथनाट्य कौतुकाचा विषय ठरला मानवी साखळी पथनाट्य प्रभात फेरी चित्रकला स्पर्धा प्रश्नमंजुषा स्पर्धा गीत गायन स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल संविधान दिनानिमित्त संपन्न झाली.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेमधील शिक्षिका उषाताई बोरेकर मॅडम अपर्णा इंगळे मॅडम संगीता ठोंबरे मॅडम सारिका वासनकार मॅडम विजया काळपांडे मॅडम तर शिक्षक विशाल नागले प्रफुल चिमणकर राजेश मुकुंदे राहुल तायडे राम इंगळे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल नागले सर तर आभार प्रदर्शन राजेश मुकुंदे सर यांनी केले



