खडसे महाविद्यालयात तिरंगा रॅली उत्साहात संपन्न

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
मुक्ताईनगर येथील श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत 11ऑगस्ट २०२५ रोजी भारतीय ध्वज तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले . स्वातंत्र्य दिवस महोत्सवाच्या निमित्ताने या रॅलीचे आयोजन महाविद्यालयातून मुक्ताईनगर शहरामध्ये प्रभात प्रभात फेरीच्या माध्यमातून राष्ट्रप्रेम व राष्ट्रीयता या उदात्त भावनेने रॅलीचे आयोजन करण्यात आले . या रॅलीच्या उद्घाटक व अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत महाजन यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगत मधून युवा वर्गाने आपले जीवन शिक्षणाबरोबर देश प्रेम व राष्ट्रीय एकात्मता याविषयी खर्च करून देशासाठी सदैव तत्पर राहावे असे रॅलीतील सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून आवाहन केले. श्रीमती जी.जी.खडसे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ . संजीव साळवे व डॉ. वंदना चौधरी यांनी रॅलीतील उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन देश कार्यामध्ये आपल्या युवा वर्गाचा अनमोल वाटा आहे याविषयी अनेक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. डी. एन. बावस्कर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कृष्णा गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. रंजना झिंजोरे यांनी केले.या अभियानाप्रसंगी महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. संजीव साळवे, उपप्राचार्य डॉ. वंदना चौधरी ,प्राध्यापक वृंद , शिक्षकेतर कर्मचारी वृंद व महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी यांनी परिश्रम घेतले.



