बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:– शंकर शिवरकर

देऊळगाव राजा | प्रतिनिधी
देऊळगाव राजा तालुक्यातील असोला फाटा येथील नागरे पेट्रोलपंपाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एका २७ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कायमी अपराध क्रमांक 294/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 281, 106(1) तसेच मोटार वाहन कायदा कलम 134 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणातील फिर्यादी रावसाहेब गणेश डोके (वय 43, व्यवसाय – शेती, रा. रोहणा, ता. देऊळगाव राजा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा मावसभाचा ऋषीकेश गजानन भागीले (वय 27, रा. टाकरखेड भागीले) हा 27 जून 2026 रोजी रात्री सुमारे 9.40 वाजता जालना येथून टाकरखेड भागीले येथे मोटारसायकल (क्र. MH-20-AP-2545) वरून जात असताना असोला फाटा येथील नागरे पेट्रोलपंपाजवळ अज्ञात वाहनाने भरधाव व निष्काळजीपणे धडक दिली.
या अपघातात ऋषीकेश भागीले यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित वाहनचालकाने वाहन न थांबवता घटनास्थळावरून पलायन केले.
फिर्यादीच्या तोंडी फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार विश्वनाथ काकड (बकल नं. 276) यांच्याकडे पुढील तपास सोपविण्यात आला आहे. फरार वाहनचालकाचा शोध पोलीस घेत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button