आंतरराष्ट्रीयमहाराष्ट्र

पिंपरी चिंचवड (पुणे) येथील रुस्तम-ए-हिंद अमोल बुचडे स्पोर्ट्स फाउंडेशन येथे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांची सदिच्छा भेट…

पिंपरी चिंचवड (पुणे) येथे खेलो इंडिया मान्यताप्राप्त रुस्तम-ए-हिंद अमोल बुचडे स्पोर्ट्स फाउंडेशन येथे केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी सदिच्छा भेट दिली. या अकादमी मध्ये लहान वयात प्रचंड जिद्द, सरावमध्ये असलेली शिस्त आणि मोठं स्वप्न उराशी बाळगून मेहनत करणारे हे खेळाडू पाहून मन भारावून जाते.

रुस्तम-ए-हिंद पै.श्री.अमोल बुचडे यांचे या क्षेत्रातील योगदान आणि युवांना देण्यात येणारी दिशा वाखाणण्याजोगी असून, त्यांच्या अथक प्रयत्नांसाठी त्यांचे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी मनापासून कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच उपस्थित युवा मल्लांशी संवाद साधून मार्गदर्शन केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button